जगभरात व्हाट्सअप, फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (सोमवारी) या माध्यमांचा वापर करताना जगभरातील युजर्सना अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या बातमीनुसार भारतात सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून व्हाट्सअप, फेसबुक व इंस्टाग्राम चालवताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी लाखो लोकांनी केल्या होत्या व
फेसबुकची फीड लोड व्हायला आणि नवीन मेसेजेस यायला अडचणी येत असल्याच्या तक्रारी युजर्सनी केले आहेत. व्हाट्सअपने देखील ट्विट करून वापरकर्त्यांना येणाऱ्या अडचणींची आम्हाला जाणीव असून लवकरात लवकर सगळ्या सुविधा सुरू केल्या जातील, असं सांगितलं आहे.फेसबुकने देखील एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की फेसबुक वापरताना लोकांना येणाऱ्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. आम्ही त्यावर सध्या काम करत असून लवकरात लवकर आमच्या सुविधा लोकांसाठी चालू करण्याचा प्रयत्न करतोय.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जगभरातील लोकांना फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप वापरताना अडचणी येत होत्या. पाच तासांच्या प्रयत्नानंतर या सुविधा सुरू झाल्या आहेत.