गुहागर दि१२ :- (प्रवीण रा. रसाळ) बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ मौजे मुंढर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, या शाखेचे माजी प्रमुख सल्लागार त्याचप्रमाणे भीमसंदेश गायन पार्टी मौजे मुंढर या पार्टीचे भीमशाहिर अनंत यशवंत गमरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले.कालकथित अनंत गमरे हे ध्येयवादी, मनमिळाऊ, कर्तबगार, प्रेमळ व कणखर बाण्याचे होते त्यानी आपल्या लोकगीतांमधून, आंबेडकरीगीतांमधून तसेच शेतकरीगीतांमधून लोकांचे मनोरंजनासोबतच जनजागृती करण्याचे काम केले, त्यांचा आवाज हा पहाडी असून सरळ काळजाला हात घालणारा असल्याने रसिक मंत्रमुग्ध होत.सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यानी स्वतःला समाज कार्यात झोकून दिले होते, ऐन उमेदीत त्यानी अनेक सामाजिक संघटनेत मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन सुना, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम शुक्रवार दि. २४ जुलै २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता आदरणीय एम.जी. गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंढर या त्यांच्या जन्मगावी आयोजित करण्यात आला आहे,
कोव्हिडं – १९ महामारीमुळे सदर ठिकाणी शासकिय नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम पार पाडण्यात येईल अशी माहिती शाखेच्या वतीने अनिल जाधव यांनी परिपत्रकात दिली आहे.