कर्जत दि १२:- तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात हॉटेल न्यू साई जवळ रोडवर एक मोटारसायकल स्वार हिरा नावाचा गुटखा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली त्यानुसार तात्काळ पोलीस जवान यांना सदर ठिकाणी पाठवून गुटखा विक्री करणाऱ्यास पकडून त्याची विचारपूस केली त्यास पांढरे रंगाचे गोणीत काय आहे.असे विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली.त्यावेळी पोलीस अंमलदार यांना गोणीचा संशय आल्याने गोणी दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यात हिरा पान मसाला,टोबॅको तंबाखू चे वेगवेगळे पुढे दिसून आले,त्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता एकूण ५५५४ रू किमतीचा एम आर पी नुसार हिरा पान मसाला मिळून आला,तसेच रोख रक्कम २३०० रू व २५००० रू.किमतीची हिरो कंपनीची पांढरे रंगाची डेस्टिनी १२५ मोटासायकल, असा एकुण ३२८५४ रू किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस अंमलदार यमगर यांनी दोन पंचांसमक्ष जागीच पंचनामा करून आरोपी सय्यद फारुक आमीन व मुद्देमाल ताब्यात घेतले.आरोपी सय्यद फारुक आमीन वय १९ वर्षे रा.खडकत ता.आष्टी, जिल्हा.बीड हा हिरा पान मसाला,टोबॅको तंबाखू चे वेगवेगळे पुढे,असे मानवी शरीरात सेवन केल्यास ते मानवी आरोग्यास हानिकारक होऊन त्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो. हे माहीत असताना सुद्धा महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचे मानवी शरीरास अपायकारक असतील असे पदार्थ विक्री करण्यास किंवा जवळ बाळगण्यास बंदी असताना त्याचे आर्थिक लाभाकरिता स्वतःचे कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने हिरो कंपनीची डेस्टीनी पांढरी रंगाची बिगर नंबर ची मो सा .गाडीसह मिळून आला आहे.म्हणून त्याचे विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला भादवि कलम ३२८,१८८,२७२,२७३ व अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (iv)२७,३०,(२)२३ प्रमाणे पोलिस अमलदार सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार सुनील माळीशिखरे हे करत आहेत.सदरची करवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने,पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर,भाऊसाहेब यमगर,सुनील खैरे, विकास चंदन,श्याम जाधव यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे