मुंबई दि २५ :- तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ कलावंत तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनामुळे संगमनेर येथे निधन झालं.बऱ्याच अडचणींना तोंड देत तमाशा मंडळाची स्थापना करून त्यांनी रघुवीर खेडकर यांच्यासोबत तमाशामाध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनात्मक जनजागृती करण्याचे कार्य केले होते.काही दिवसांपूर्वी कांताबाईना कोरोनाची लागण झाली होती व त्यातच त्यांचे दि. २५ रोजी रात्री दुःखद निधन झाले.सन २००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला होता, अश्या महान कलासुर्याचा कोरोनामुळे अस्त झाला. त्यांच्या अचानक जाण्याने लोककलावंत, कलावंत, तसेच तमाशा फडमालक यांच्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.