पिंपरी चिंचवड दि २५ :- कुरकुंडी येथील वृध्द महिलेची हत्या करून तीचेवर अतिप्रसंग करणा-या नराधमास चाकण पोलिसांनीअवघ्या ४ ते ५ तासातच जेरबंद केले.व चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २४ रोजी पाईट पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक विकास पंचमुख यांना फोन व्दारे माहिती मिळाली की, कुरकुंडी ता. खेड जि. पुणे येथे घरात एकटी राहणारी वयोवृध्द महिला(वय ७१ वर्षे) हि तीचे राहते घरात जखमी होवुन रक्ताचे थारोळयात पडलेली असुन तीचा खुन झाला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरक्षक अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे, डि.बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे व सहकाऱ्यांनी तात्काळ सदर घटनास्थळी जावून गुन्हयाचे घटनास्थळाची पहाणी केली सुरूवातीला सदरचा खुन कोणी, कशाने व का केला असावा या बाबत काहीएक समजुन येत नव्हते. मात्र अधिक तपास करीत असताना गुन्हयाचे घटनास्थळावर श्वान पथकाला व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करण्यात आले.चाकण पोलीसांची पथके त्वरित तयार करून संर्पण कुरकुंडी गाव पिंजुन काढले व बारीक सारीक माहिती जमा करून गुन्हयाचे घटनास्थळी वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शनाखाली पथके तयार करून रवाना केली. अवघ्या ४ ते ५ तासात सदर गुन्हयाची
उकल करण्यात आलेली असुन गुन्हयातील आरोप अनिल सुदाम वाघमारे (वय ५२ वर्षे रा. कुरकुंडी ता. खेड जि. पुणे) याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा घडल्यापासुन काही तासातच त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी अनिल सुदाम वाघमारे याने वयोवृध्द महिलेच्या घरात घुसून तिचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता आरोपी अनिल वाघमारे याने तीचे डोक्यात घरात असलेल्या चुलीचे समोरील लोखंडी फुकारीने मारून गंभीर दुखापत करून तीला ठार मारले. व ती मयत झाल्यावर तीच्यावर अतिप्रसंग केला असल्याचे तपासात समोर आलेले आहे. सदर गुन्हयाचे तपासात पुणे येथील श्वान पथकातील श्वॉन ‘जॅक’ याची मोलाची मदत झालेली आहे. सदर घटने बाबत मयताची सुन(वय ५० वर्षे रा.कुरूकुंडी ता. खेड जि.पुणे)यांच्या फिर्यादी वरून चाकण पोलीस स्टेशन फिर्याद दिली आहे व गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त, कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कटटे यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) अनिल देवडे,पोलीस उप निरीक्षक,विजय जगदाळे, विकास पंचमुख, महिला पोलीस उप निरीक्षक प्रियांका साळुखे, पो.हवालदार सुरेश हिंगे, दिपक हांडे, पोलीस नाईक संदिप सोनवणे, हनुमंत कांबळे, पो.कॉ दत्ता बिराजदार,शशिकांत होले, किरण मांजरे, निखील वर्षे, प्रदिप राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, महिला पोलीस शिपाई सुप्रिया धुमाळ यांनी केलेली आहे.व पुढील तपास अशोक राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे करत आहे