पुणे दि १३ :- पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अज्ञात शाखेचा एतिहासिक कागदपत्रांमधून उलगडा होत आहे. शिवाजी महाराज यांना दोन मुले झाली, पहिले संभाजी राजे द्वितीय राजाराम महाराज हे सर्वांना माहीत आहेत.
छत्रपती संभाजी राजे यांचे दोन विवाह झाले. पहिला विवाह राजेशिर्के घराण्यातील येसुबाई यांच्या सोबत झाला. त्यांच्या पासून शिवाजी राजे उर्फ छत्रपती शाहू(थोरले) यांचा जन्म झाला. हे सर्वश्रूत आहे, त्यांचा दूसरा विवाह जाधवराव घराण्यातील दुर्गाबाई यांच्या सोबत 1675 साली झाला. तसेच हा विवाह स्वता शिवाजी महाराज यांच्या समक्ष झाला होता. या विवाहातून चार अपत्य जन्मास आली. त्यात दोन मुले व दोन मुली होत्या, त्यातील मुलांची नवे 1. मदनसिंह, 2. माधवसिंह
मुलींच्या नावाबद्दल जास्त उल्लेख आढळून आला नाही.
छत्रपती संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर रायगड किल्ला पडाव झाला व राजकबिला कैदेत सापडला.त्यामध्ये छत्रपती शाहू राजे (थोरले), मदनसिंहा, माधवसिंह, सकवारबाई, येसूबाई व दुर्गाबाई असल्याचा संदर्भ मिळतो. पुढे 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज महाराष्ट्रात आले. त्यांनतर शाहूनी 1719 साली दिल्ली मोहीम आखली व राजकबिलयाची सुटका केली. त्यामध्ये मदनसिंह होते. 1698 साली माधवसिंह यांचा मृत्यू झाला होता. मदनसिंह यांना दोन अपत्य झाली ते 1. संभासिंह 2. रूपसिंह या सर्व इतिहासाची माहिती सर्वांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने या शाखांचा समग्र इतिहास आणि पुढच्या पिढ्यांचे विवेंचन शिववंश या संशोधन ग्रंथाचे न्यू ईरा पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून पुस्तकरूपी प्रकाशित करीत आहोत. या पुस्तकाचे अभ्यासपूर्वक लेखन करणसिंह बांदल यांनी केले आहे. यापूर्वी रावण राजा रक्षसांचा, दी आंत्रपेणार, मुक्कादार अश्या बर्याच पुस्तकांचे प्रकाशन या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत. शिववंश या पुस्तकाच्या मुखपृष्ठचे अनवरण कार्यक्रम 13 मे 2021 रोजी पुणे येथील पत्रकार भवन येथे पार पडला. यावेळी करणसिंह बांदल, सौरभ अमराळे, गणेश खुटवड, गोरखराव करांजवणे तसेच बाळासाहेब अमराळे व शरद तांदळे उपस्थित होते