पुणे दि १३ : – पुणे शहरातील पाषाण येथील शिवशक्ती चौक येथे देवाश सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे.याप्रकरणी रोहित संजय खलसे (वय 30) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पाषाण परिसरात शिवशक्ती चौक येथे देवाश सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. 7 ते 12 मे यादरम्यान या दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश केला. तसेच रोकड व तेलाच्या पिशव्या असा एकुण 31 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करीत आहे