पुणे दि ०२ :-कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावमुळे फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना ही कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. कोविड महामारी विरोधात लढण्यासाठी ऑल इंडीया स्टेशन मास्टर असोसिएशन (AISMA) या संघटनेच्या पुणे विभागाच्या माध्यमातून स्टेशन मास्तर यांनी तीन दिवसांचा पगार रकमेतून पाच लाखांची उपकरणे खरेदी करून ती रेल्वे हॉस्पिटलला प्रदान केली आहेत.पुण्यातील रेल्वे हॉस्पीटलला आवश्यक वैद्यकीय उपकरणे जसे छोटे व्हेटीलेटर, बेड मॉनिटर ऑल इंडीया स्टेशन मास्टर्स असोसिएशनने करोना लढाईसाठी दिली आहेत. याप्रसंगी एस.के.मिश्रा जनरल सेक्रेटरी मध्य रेल्वे, गंगाधर साहु (मंडल अध्यक्ष) , कृष्ण मुरारी (मंडल सचिव) , अमित कुमार (मंडल कोषाध्यक्ष) , शकिल इनामदार (संघटन सचिव) , दिनेश कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.भारतीय रेल्वेतील सर्व स्टेशन मास्टरांचे हे संघटन प्रथम पासुनच करोना लढाईत देशभर सशक्त पावले उचलत असून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करते आहे. पहिल्या चरणात देशभरात सर्व स्टेशन मास्टरांनी स्वतःचा तीन दिवसाचा पगार जाहीर केला होता. देशभरात अनेक ठिकाणी सर्व स्टेशनवर आवश्यक साहीत्य मास्क, सॅनेटाझर, थर्मामिटर, ऑक्सीमीटर, वाटप केले होते. एआयएसएमए संघटनेने प्रत्येक शहीद स्टेशन मास्टरच्या परिवाराला 50 हजार रुपयाची ताबडतोब मदत करते आहे.करोना काळात या संघटनेने रेल्वेतील सर्व फ्रंटलाईन स्टाफसाठी 50लाखाच्या विम्याची मागणी सरकारला केली आहे.देशाच्या या कठीण प्रसंगी सर्व कामगार संघटनांनी प्रशासनास अशाप्रकारे मदत करून आपल्या कामगारांचे प्राण वाचवण्यास सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी केले आहे.