श्रीगोंदा दि ०१:- कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुटवडा भासत असून सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (३मे) रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
राज्यात व जिल्ह्यात कोविड-१९ महामारीने उच्छाद मांडला असून दररोज हजारो रुग्ण कोरोना बाधित होत आहे. या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हर लस याची जशी गरज भासत आहे. त्यापेक्षाही अधिक रक्ताची गरज भासत आहेत. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून प्रदेशाध्यक्ष युवा नेते सत्यजीत दादा तांबे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत कोरोना नियमाचे पालन करून अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय व मढेवडगांव येथील कोविड सेंटर येथील रुग्णांना ड्रायफ्रूटस, बॉईल अंडे, सॅनिटायझर व वाफ घेण्याच्या मशीन यांचे वाटप उपक्रमांचे आयोजन श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेस, श्रीगोंदा तालुका अल्पसंख्याक विभाग , श्रीगोंदा तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती अल्पसंख्याक विभगाचे शहराध्यक्ष जैद शेख व विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस यांनी दिली. ज्या रक्त दात्याना रक्तदान करून हातभार लावायचा असेल त्यांनी खालील नंबर वरती संपर्क करावा.जैद आत्तार- 9822232625,धीरज खेतमाळीस- 7083693535,आदिलशेख-8888778602,रामजाधव-9922911515तरी रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे आपण केलेले रक्तदान रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे. रक्तदान शिबिर ३/५/२०२१रोजी सोमवारी उर्दू शाळा श्रीगोंदा येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल, रक्तदात्यांनी तोंडाला मास्क लावून यावे व शिबिराचे ठिकाणी शारीरिक अंतर नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष स्मितलभैय्या वाबळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की माझ्या जन्मदिनी भेट म्हणून पुष्पगुच्छ शाल हार श्रीफळ हे न आणता आपल्या परिसरातील गरजू व गरीब कुटुंबांना धान्य व जीवन उपयोगी अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा हे नम्र आवाहन केले आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे