कर्जत दि २३ :-निंबोडी या गावांमध्ये चोरट्यांनी दि.१०एप्रिल रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील निंबोडी या गावांमध्ये चोरट्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध घटने बाबत कर्जत पोलीस स्टेशन येेेथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,तालुक्यातील निंबोडी येथील बापु गणपत गरड यांची घरासमोर बांधलेली शेळी चोर चोरुन घेऊन जात असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी आरडा ओरडा केला व त्यांचा भाऊ खंडु व भाचा किसन असे जागे होवुन डांबरी रस्त्याकडे पळत गेले त्यावेळी त्यांना शेळी चोरून घेवुन जात असतांना चोर दिसले त्यानंतर बापु गणपत गरड यांनी मोटरसायकलवर पळुन जात असलेल्या एका चोरास पाठीमागुन जोराची कवळ घालुन धरुन ठेवले असता झालेल्या झटापटीत आरोपीने त्याचेकडे असलेल्या गावठी कटयामधुन गोळी बार करुन खंडु किसन गरड, भरत दिनकर बर्डे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले होते.
त्यानंतर जिल्हा पोलिसप्रमुख पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. गोळीबाराचा प्रथमच प्रकार घडल्याने ग्रामस्थ दहशतीखाली होते.
या आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्याने,कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करुन मार्गदर्शन करुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापुर, बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील १०० पेक्षा जास्त आरोपी चेक करण्याकरिता पाचारण करण्यात आली. पो.नि.चंद्रशेखर यादव, स.पो.नि सुरेश माने, पो.स.ई अमरजित मोरे व टीमने केलेल्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा अमर दत्तु पवार रा.आरणगाव ता.जामखेड व त्याचा साथीदार करण पंच्याहत्तर काळे रा. पाथरुड जि. उस्मानाबाद यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेतला असता वरील आरोपी हे पोलीस पथकाला सतत हुलकावणी देत होते.
दि.२१ एप्रिल रोजी आरोपी हे पाथरुड, वडगाव नळी परिसरात फिरत असल्याचे कर्जत पोलीस पथकाला समजल्याने पोलीस निरीक्षक यादव, स.पो.नि सुरेश माने व पो.उनि.अमरजीत मोरे यांनी दोन दिवस सदर परीसरात थांबून तेथील भौगोलीक परीस्थीतीची माहिती घेवुन दि.२२ रोजी रात्री सापळा लावुन सदर डोंगरावर आरोपी अमर दत्तु पवार वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी करण पंच्याहत्तर काळे रा.पाथरुड ता भुम हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. ताब्यात घेतलेला आरोपी अमर पवार याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, महादेव कोहक, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमीत बर्डे, गणेश काळाने, रविंद्र वाघ, महीला अंमलदार कोमल गोफणे, सचिन राठोड मोबाईल सेल, किरण बोराडे, दादा टाके श्रीगोंदा पोस्टे,जामखेड पोस्टेचे डि बी पथकातील पोलीस अंमलदार यांची मदत झाली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे