कर्जत दि १९ :- बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपीस कर्जत पोलीसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दौंड येथून अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी उर्फ विकास श्याम जाधव रा. भांबोरा ता. कर्जत ह्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनांक १६/०४/२०२१ रोजी अल्पवयिन मुलीच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन येेेथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपीने सदर मुलीचा रस्त्यात विनयभंग केला होता. हा फरार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस त्याचा भांबोरा,दौड,पुणे येथे शोध घेत होते.
दोन महिन्यापासून फरार असलेला आरोपी विकी उर्फ विकास श्याम जाधव रा.भांबोरा ता. कर्जत हा दौड येथे असल्याची बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने जाऊन त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,कर्जत पोलिस स्टेशनचे चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरसाट,पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते,पोलीस जवान देवा पळसे, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे,यांनी केली असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे