वांगणी दि १९ :-दि.17/04/2021 रोजी 5 वाजून 3 मी 40 से. वाजता वांगणी स्टेशन वरून एक्स्प्रेस जात असताना ऐक अंध स्री व तिचा लहान मुलगा जात असताना प्लॅटफॉर्म वरून मुलगा खाली पडला.तितक्यात शेळू – वांगणी – बदलापूर मार्गे एक्स्प्रेस येत होती.ऐका कर्मचाऱ्याने त्याचे प्राण वाचवले. कर्मचाऱ्याला ४-५सेकंद जरी उशीर झालं असता तर ते मुल आज एक्स्प्रेस खाली गेलं असत.पण क्षणाचा विलंब न करता त्या कर्मचाऱ्याने स्वताच्या जिवाची पर्वा न करता त्या मुलाचे प्राण वाचवले.हा सर्व प्रकार cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे.त्या मुला बरोबर
असणारी स्री ही आंध आहे.त्यामुळे ती अत्यंत गडबडली व घाबरून गेली.त्या मुलाचे प्राण वाचवणारा कर्मचाऱ्याचे नाव मयूर शेळके असून त्याचा सर्वच विभागाकडून त्याच्या या शूर पराक्रमाचा गौरव पुरस्कार करण्यात येत आहे. सदर माहिती कर्मचारी दत्ता किर्वे यांनी दिली.असून cctv फुटेज मध्ये हा प्रकार कैद झाला आहे
दौड प्रतिनिधी :- महेश देशमाने