अक्कलकोट दि ३० :- (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने प्रचंड हाहाकार माजला असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मंदिरे बंद करण्याच निर्णय राज्य सरकारने घेत असून सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथे सध्या दर्शन चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अटी व शर्ती नसून वयोवृद्ध सहित लहान मुलांना देखील दर्शन उपलब्ध होत आहे. मात्र राज्यातील व इतर राज्यातील येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन घेण्यासाठी व अभिषेक करण्यासाठी पूजेचे साहित्य विकण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या अनेक दुकानदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद करण्यासाठी आदेश दिले आहेत एकीकडे मंदिर चालू असून दुसरीकडे या दुकानदारांचे उपासमार होत असून गेल्या सात-आठ महिन्यांपासून आधीच कर्जबाजारी असलेल्या गाळेधारकांना आता कुठेतरी सुरुवात झाली होती पण मंदिर प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून मंदिर चालू असून भक्तगण येत असून जर त्यांच्यामुळे कोरोना वाढत नसेल आणि दुसरीकडे या दुकाने चालू केल्यास कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा संभ्रमात असलेल्या प्रशासनाने मंदिर देखील बंद करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे मंदिर चालू करून मंदिराच्या ट्रस्टला एकीकडे श्रीमंती करायचे आणि दुसरीकडे मंदिराच्या जीवावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या गोरगरीब गाळेधारकांचे मात्र उपासमार आपण करीत आहात हा कोणता न्याय आहे. तरी प्रशासनाने याचा सारासार विचार करून एक तरी ह्या गाळेधारकांना दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा सरसकट मंदिर देखील बंद करावे. मंदिर चालू करून पूजेसाठी लागणारे व अभिषेक करण्यासाठी लागणारे जर साहित्य या भाविकांना उपलब्ध होत नसेल तर इतक्या लांबून येणाऱ्या भाविकांची देखील हिरमोड होत आहे. तरी प्रशासनाने यावर ती योग्य तो निर्णय घेऊन एक तर या गाळेधारकांना न्याय द्यावा अन्यथा मंदिर बंद करावे असे सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे त्यांचे मागणी नुसार गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे यामुळे रिपब्लिकन आठवले पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे याविषयी स्वामी समर्थ मंदिर येतील दुकाने शनिवारी व रविवारी दिवस भर चालू ठेवण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिले आहेत