पिंपरी चिंचवड दि ०३ :- पिंपरी चिंचवड वाहतुक शाखा पोलीस आयुक्तालय अंतर्गत तोतया सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांना त्यांचे बनावट ओळखपत्रासह पकडुन केले गजाआड पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त.कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वाहतुक नियमांचे उल्लघंन करणारे वाहन चालकांवर कठोर कारवाई करणेबाबत तसेच कोचीड ११ च्या संसर्गाच्या अनुषंगाने विना मास्क फिरणारे इसमांवर कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्यांने निगडी वाहतुक विभागाचे जाधव सरकार चौक कुंदळवाडी या ठिकाणी पी.टी.पी.नाकांबदी व विना मारक ची कारवाई करत असताना तोतया सहायक पोलीस आयुक्त मुंबई यांस त्यांचे बनावट ओळखपत्रासह पकडुन
कारवाई करण्यात आलेली आहे . दिनांक ०२/०३/२०२१ रोजी सांयकाळी ०५:३० वाजण्याचे सुमारास जाधव सरकार चौक कुंदळवाडी या ठिकाणी पी.टी.पी.नाकाबंदी व विना मास्क कारवाई करत असताना होंडा जांज कार क्रमांक एम.एच .५० एल .२२१६ या कारमध्ये बसलेल्या दोन इसमांनी मास्क घातलेले नसल्यांनी कारवाई करीता वाहन बाजुला घेतले असता चालका शेजारी बसलेले इसमांने मुंबई पोलीसांत ए.सी.पी. असल्याचे सांगितले म्हणुन त्यांना ओळखपत्र विचारले असता त्यांनी ओळखपत्र दाखविले . सदरच्या ओळखपत्रावर असलेल्या फोटोमध्ये फोटोतील व्यक्तीच्या खादयांवर राजमुद्रा व स्टार असल्याचे फोटोत दिसत असल्याने ओळखपत्र बनावट असल्याने शंका आली म्हणुन त्यांना जवळच्या कुंदळवाडी चौकीत नेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता सदर इसमांने ओळखपत्र बनावट असल्याचे मान्य केले इसम नामे प्रविण लक्ष्मण सुर्यवंशी यांचेवर बनावट पोलीस ओळखपत्र तयार करुन सहायक पोलीस आयुक्त असल्याचे पोलीसांना बतावणी केल्याने तयांचेविरुध्द पो.ना . सुनिल शिवाजी
गायकवाड नेमणुक निगडी वाहतुक विभाग यांनी चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरची कामगिरी.पोलीस आयुक्त .कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उपआयुक्त ( वाहतुक शाखा ) सुधिर हिरेमठ , मा.सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले , पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे , यांचे मार्गदर्शखाली पोलीस उप निरीक्षक एस.एस.राउत , पोना गायकवाड , पोना दहिफळे , पोशि कशाळे , पोशि कोल्हे , यांनी केली आहे . सदरबाबत चिखली पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहे .