पुणे दि ०३ : – बंजारा समाजातील पीडित तरूणीचे काही राजकीय पक्षांकडून बंजारा समाजाची नाहक बदनामी केली जात असून, पीडित तरूणीचे फोटो, ऑडिओ क्लिप वारंवार प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चारित्र्यहनन केल्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आरोप करत अॅड.डॉ. रमेश खेमू राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड रमेश राठोड यांनी केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी परळीच्या पीडित तरुणीने उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद आहे. पण यात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने खळबळ उडाली. दरम्यान यानंतर काही राजकीय पक्षांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करावी, अशी मागणी केली. तर यावरून राज्यात रान माजवले आहे. राजकीय पक्षांचे नेते मंडळींकडून बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर पीडित तरूणीबाबत दिवसेंदिवस विविध ऑडिओ क्लिप व फोटो व्हायरल करून बदनामी केली जात आहे. त्यामुळे बंजारा समाजाची बदनामी होत आहे. ही बदनामी थांबविण्याची मागणीही अॅड. राठोड यांनी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. त्याशिवाय समाजाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करावी. तसेच पीडित कुटूंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. राज्यघटनेतील ३९ कलमानुसार प्री लिगल सव्र्हिस देण्याची मागणी त्यांनी केली आहे. व अन्यथा राज्यभर बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला आहे