पुणे दि.१८- गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षणाद्वारे देशातील शहरांमध्ये स्वच्छता अभियानांतर्गंत स्पर्धा घेत असून, 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांक प्राप्त करुन देण्यासाठी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनतेने सहकार्या करावे, असे आवाहन पुणे महानगर पालिका घन कचरा व्यवस्था विभागचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील रीजनल आऊरिंच ब्युरो द्वारे हडपसर, पुणे येथील साधना विद्यालयात आयोजित स्वच्छ भारत अभियान शहरी विशेष जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुणे महानगर पालिका सहायक आयुक्त सुनील यादव, साधना विद्यालयाचे प्राचार्य अजित अभंग, आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाडके आणि फिल्ड आऊटरिच ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी माधव जायभाये, महानगरपालिकेचे अधिकारी , कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी आदि उपस्थित होते.
मोळक पुढे म्हणाले की, पुणे शहरात जवळपास 2 हजार 200 मेट्रीक टन घणकचरा गोळा होतो, या कचऱ्याचे वर्गिकरण करुन आलो कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यात येत आहे, शहरातील जनतेने कचऱ्याच्या वर्गिकरणाबरोबरच प्लॉस्टीकचा वापर करने पुर्णपणे बंद करुन पर्यावरणाबरोबरच जीवनमान सुधारण्यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
मुख्य कार्यक्रमापुर्वी हडपसर परिसरातून विद्यार्थींची स्वच्छ भारत संकल्पनेवर अधारित एक जनजागरण रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक आणि ढोल ताशाच्या गजरात आपले शहर स्वच्छ व सूंदर ठेवण्याबरोबरच प्लॉस्टीक मुक्ती शहर, नद्यांचे प्रदूषण थांबवा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचओ बेटी पढावचा संदेश देत एक वातावरण निर्मिती केली.
रीजनल आऊटरीच ब्यूरोद्वारा आयोजित गीत व नाटक विभागाने सांस्कृतिक कार्यकरमातून आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला. साधना विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वच्छ भारत – सूदर भारत व बेटी बचाओ बेटी पढाओ अशी दोन पथनाट्य सादर करुन उपस्थितांमध्ये एक जागरुती निर्माण करत शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमापुर्वी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानावर अधारित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला साधना विद्यालय मुले आणि मुली अशा दोन शाळांमधून जवळपास 1 हजार 500 विद्यार्थांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जायभाये यांनी केले यावेळी त्यांनी या कार्यक्रमाची रुपरेशा विषद करुन केंद्र सरकारद्वारे घेण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली.