पुणे दि १५ : – वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, व हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे पुणे वाहतूक पोलिसांकडुनआज आणि उद्या मोफत चहाचे कूपन देण्यात येणार आहे.व आज सकाळी बालगंधर्व रंगमंदीराजवलील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले.आहे नियमाचे पालन करणाऱ्या दहा हजार नागरीकांना आज आणि उद्या (रविवार) मोफत चहाचे कूपन देण्यात येणार आहे.
नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि हेल्मेट वापर करणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्सहन देण्यासाठी जागतिक चहा दिनाचे औचित्य साधुन वाहतूक शाखा पोलिसांनी व येवले अमृततुल्य यांच्यावतीने शनिवारी व रविवारी आगळा वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
आज सकाळी आठ वाजल्या पासून बालगंधर्व रंगमंदीराजवलील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात वाहतुक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकास चहाचे कुपन देऊन या उपक्रमाची सुरुवात प्रातिनिधिक स्वरुपात सुरवात करण्यात आली आहे आशी माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे