पुणे दि २३ :- पुणे परिसरात करोडो रुपयांची फसवणुक करणाऱ्या ठगास आरोपी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट ०४ च्या जाळ्यात ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ ( AOL ) चे मुख्यालय उदयपुर बेंगलोर येथे असुन त्याच्या शाखा देशभरात आहे सदर संस्था ही लोकांना ध्यान धारणांचे प्रशिक्षण देण्याचे व ध्यान धारणेचे महत्त्व लोकांना पटवुन देण्याचे महत्वाचे काम करते . त्याच्या पुण्यातसुद्धा शाखा आहेत . इसम नामे प्रणय उदय खरे याने सदर ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ संस्थेत प्रवेश मिळवुन डी.डी.सी. ( डीस्ट्रीक डेव्हलपमेंन्ट कोऑर्डीनेटर ) या पदावर असल्याचा बनाव करुन ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ ची त्याचे जे . के . व्हेंचर्स कंपनी मार्फत कार्यशाळा आयोजीत करीत होता . सदर कंपनी ही ‘ आर्ट ऑफ लिव्हींग ‘ या संस्थेशी संबंधित असल्याबाबत लोकांना माहिती देवुन वेगवेगळ्या आर्थीक गुंतवणुकीच्या स्कीम सांगुन त्यांचा विश्वास संपादन करत असे व त्यांचेकडुन मोठमोठ्या रकमा घेवुन त्या रकमेचा स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता वापर करीत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती . इसम नामे प्रणय उदय खरे रा . फ्लॅट नं . १ , मोनार्च गार्डन सोसा . , एन.आय.बी.एम. साळुखे विहार टेलिफोन एक्सचेंजचे मागे , कोंढवा , पुणे याचेविरुध्द प्राप्त तक्रारीमध्ये त्याने जे.के.व्हेंचर्स नावाची बोगस कंपनीची स्थापना करुन कंपनी मार्फत रत्नागिरी , खेड येथे ७ हजार एकर जागा घेतली आहे असे सांगुन . सदर जागे मध्ये १५ वर्षा करीता १ एकर जागे साठी गुंतवणूक केल्यास , पहिल्या ११ गुंतवणूकदारांना १ कोटी रुपये , त्यानंतरचे ५० गुंतवणूकदारांना ५० लाख रुपये , त्यानंतरच्या उर्वरीत गुंतवणूकदारांना ४० लाख रुपये , सहा वर्षांनंतर टप्याटप्याने दिले जातील तसेच एस.टी.पी. ( शॉर्ट टर्म प्लॅन ) , व मोरीगा झाडे लावण्याचे प्लॅन मध्ये पैसे गुंतवल्यास फिर्यादीला भरपुर नफा मिळेल , असे भासविल्याने फिर्यादीने एकुण १, करोडो ४५ लाख १६, हजार १११ रुपये वरील कंपनीचे स्किम मध्ये गुंतविले परंतु कोणताही परतावा न देता आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायदया करीता , पैशांचा अपहार करुन फसवणुक केली . म्हणुन अश्वीनीकुमार बळीराम कांबळे यांनी त्याचे विरुद्ध चतृश्रृंगी पोलीस स्टेशन तक्रार दिल्याने सदर बाबत दाखल गुन्ह्यामध्ये ठग आरोपी नामे प्रणय उदय खरे यास दिनांक २३ नोव्हेंबर रोजी युनिट -४ गुन्हे शाखेकडुन अटक करण्यात आली असुन मा.न्यायालयाने त्याची ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे . तसेच नमुद आरोपीने १ ) विस्तार ३६० , २ ) दि योगीक , ३ ) ए.एच.ओ.लाईफ स्टाईल प्रा.लि. , ४ ) प्रणल्स मेडिया प्रा.लि. नावाने कंपन्या स्थापन केल्या असुन त्यामार्फत देखील त्याने वेगवेगळया लोकांची वरिल स्किमच्या माध्यमातुन पुणे शहरात व पुणे शहराबाहेर बऱ्याच लोकांना फसवले असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे . तरी नागरिकांनी समोर येवुन अशाप्रकारे कोणाची फसवणुक झालेली असल्यास गुन्हे शाखा युनिट -०४ रेंजहिल्स खडकी पुणे येथे संपर्क साधावा असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे . सदरची कामगिरी ही मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त गुन्हे , बच्चनसिंह ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -४ चे पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल , पोलीस उप – निरीक्षक दिपक माने.पोलीस उपनिरीक्षक – शशिकांत शिंदे , पोउपनि गिता पाटील सपोफौ . शंकर पाटील , पो.हवा . गणेश साळूके , पोहवा राजस शेख , पोना सुरेंद्र साबळे , सचिन ढवळे , प्रविण कराळे प्रविण भालचिम , नागेश कुवर , दत्तात्रय फुलसुंदर यांनी केलेली आहे .