पुणे दि २३ : – पुणे तळेगाव ढमढेरे परिसरात दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपी नामे अविनाश देविदास गायकवाड वय १९ वर्षे सध्या राहणार तळेगाव रोड गुरुकृपा बिल्डिंग यश नर्सिंग होम च्या मागे शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार माळीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली असे सांगितले नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या 1 दुचारी जप्त करण्यात आल्या आहेत. तळेगाव ढमढेरे आसपासच्या परिसरातून दुचाकी चोरल्या होती. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडणेकामी मोहिम राबवित असताना, आज दि २३ नोव्हेंबर रोजी संशयित आरोपी नामे आरोपी नामे अविनाश गायकवाड हा चोरीची मोटरसायकल वापरीत आहे त्या मोटारसायकल सह तो शिक्रापूर चाकण चौक परिसरात येणार असल्याची सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास मोटारसायकल सह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अविनाश देविदास गायकवाड असे सांगितले त्याचे कब्जात असलेल्या मोटरसायकल बाबत त्याच्याकडे विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल ही शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोड सर्वेश ऑटो गॅरेज शेजारील बिल्डिंगचे पार्किंग मधून चोरल्याचे सांगितले त्यावरून अधिक माहिती घेता सदर मोटरसायकल चोरीबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल असून सदरची २० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल चोरीस गेलेले बाबत भुमेश जगन्नाथ गवारी राहणार शिक्रापूर तळेगाव ढमढेरे रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी दि, १२ नोव्हेंबर रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीची फिर्याद दिलेली आहे.
त्याचे कब्जात वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास त्याने चोरलेल्या मोटार सायकल सह पुढील कार्यवाही करिता शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. पृथ्वीराज ताटे, सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर,पो.हवा. उमाकांत कुंजीर,पो ना राजू मोमीन,पोना. जनार्दन शेळके,पोना. अजित भुजबळ, पो ना मंगेश थिगळे,पो शी प्रसन्ना घाडगे यांनी केलेली आहे.