पुणे दि २६ :- पुणे पोलीस मुख्यालय , शिवाजीनगर , पुणे येथे शस्त्र पूजनाचे कार्यक्रम दि .२५ रोजी सकाळी ०८.०० वाजता पुणे पोलीस मुख्यालय , शिवाजीनगर , येथे दसरा सणानिमित्त शस्त्र पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर
शस्त्र पूजनाचा कार्यक्रम अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचे हस्ते पार पडला आहे . कार्यक्रमावेळी विविध शस्त्रांची विधिवत पूजा करुन आरती करण्यात आली . सदर कार्यक्रमावेळी डॉ.जालिंदर सुपेकर , अपर पोलीस आयुक्त , प्रशासन , पुणे शहर , श्रीमती भाग्यश्री नवटके , पोलीस उप –
आयुक्त , आर्थिक व सायबर , गुन्हे , पुणे शहर , श्रीमती.स्वप्ना गोरे , पोलीस उप – आयुक्त , मुख्यालय , पुणे शहर , मितेश घट्टे , पोलीस उप – आयुक्त , विशेष शाखा , पुणे शहर , सतिश गोवेकर , सहा.पोलीस आयुक्त ,सं.वि. मुख्यालय , पुणे शहर , मकृष्ण
गोटमवाड , राखीव पोलीस निरीक्षक , मुख्यालय , पुणे शहर व राजेंद्र कुळसंगे , राखीव पोलीस उप – निरीक्षक यांचे सह मुख्यलयातील इतर कार्यालयीन स्टाफ उपस्थित होते . सदरचा कार्यक्रम कोरोना आजाराच्या कोव्हीड -१ ९ अनुषंगाने दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन शांततेत पार पडला