पुणे दि २६ :- पुणे परिसरात कात्रज पुणे येथील कात्रज चौक , जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे बिल्डींग समोर अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व , गुन्हे शाखा , पुणे शहर एम . डी . ( मॅफेड्रॉन ) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आणलेले मुद्देमालासह गुन्हेगारास अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व गुन्हे शाखेने गुन्हेगारास केले गजाआड दि .२५ रोजी अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पथक भारती विद्यापीठ भागात पेट्रोलींग करत असताना कात्रज पुणे येथील कात्रज चौक , जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे बिल्डींग समोर पुणे मुंबई बायपासकडे जाणारे रोडचे कडेस स्विफ्ट डिझायर कार नं एम एच १२ एन एक्स ४९५० या कारमध्ये आरोपी नामे १ ) विसारत अली सनाउल्ला , वय -३२ वर्षे , रा . स्वप्नालो बिल्डींग , प्लॅट नं -४ , लेन नं – ९ , के के मार्केट जवळ , बालाजीनगर , धनकवडी , पुणे मुळ- ग्राम- पाचगाची , पोस्ट- पव्वाखली ,
जिल्हा- किशनगंज , राज्य बिहार २ ) ब्रिजेश उपेंद्र शर्मा , वय -३८ वर्षे , रा . दाना बंदर , रायचुर इस्टेट , झोपडा नं -४६ , डोंगरी , मुंबई हे संशयास्पदरित्या मिळुन आल्याने त्यांची झडती घेता त्यांचे ताब्यात किंमत रुपये १० लाख,६३ हजार, रूपयाचा २१२ ग्रॅम ६०० मिली ग्रॅम एम .डी. ( मॅफेड्रॉन ) हा अंमली पदार्थ , बेकायदेशिररित्या विक्रीकरीता आणले असताना व जवळ बाळगळेला असताना पोलिसांना मिळुन आले . सदरचा अंमली पदार्थ व नमुद इसमांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कर नं एम एच १२ एन एक्स ४९५० व २ मोबाईल हॅन्डसेट असा एकुण १५ लाख,७० हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे . नमुद इसमां वर भारती विद्यापीठ पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक , लक्ष्मण ढेंगळे , अंमली व खंडणी विरोधी पथक , पुर्व , गुन्हे शाखा हे करीत आहे . वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त , गुन्हे अशोक मोराळे. पोलीस उप आयुक्त , गुन्हे , बच्चन सिंग. सहा पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , सुरेंद्र देशमुख तसेच . सहा पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे , सहा . पोलीस निरीक्षक बापु रायकर , पोलीस कर्मचारी राहुल जोशी , शिवाजी राहिगुडे , प्रशांत बोमादंडी , मनोज साळुके , संतोष जाचक , विशाल शिंदे , चेतन गायकवाड , विशाल दळवी , चेतन शिरोळकर , अमित छडीदार , योगेश मोहिते यांनी केली आहे .