पुणे दि,३०:- तक्रारदार यांच्या वहनाचा अपघात लोणी काळभोर परिसरात झाला होता सदर अपघातातील वाहन लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता अपघातातील वाहन आरटीओ कडून तपासणी करून सदर वाहने परत देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशन पोलीस नाईक लोकेश राऊत यांनी तक्रारदार यांच्या कडून चाळीस हजार रुपये मागणी केली होती तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय मध्ये तक्रार नोंदवली होती दि ३० पडताळणी करून १०००० हजार रुपये स्विकारताना पोलीस नाईक लोकेश राऊत वय ३० अँन्टी करप्शन रंगेहात पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ही पोलीस उपायुक्त पोलीस अधिक्षक संदीप दिवाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे