पुणे दि २७ :- पुणे रेल्वे विभागाने साखर, तेल उत्पादनांसह देशातील बर्याच ठिकाणी नियमितपणे विविध प्रकारचे सामान इत्यादी पाठवतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे रेल्वे विभागातर्फे प्रथमच बांगलादेशला कार्स ची वाहतुक केली गेली आहे. अलीकडेच रेल्वेने स्थापन केलेला व्यवसाय विकास घटक (Business development unit) आपल्या सक्रिय प्रयत्नांनी पुढाकार घेऊन नवीन व्यवसाय मिळविण्यात यशस्वी झाला आहे. जलद वाहतूक परिवहन, वाजवी दर आणि सुरक्षित संचालन अशा रेल्वेच्या या विशेष वैशिष्ट्यांचा विचार करून, या दिशेने विशेष रुची दर्शविणार्या ट्रान्स पोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले उत्पादन रेल्वेमार्गे बांगलादेशला पाठविले आहे. त्याद्वारे पुणे रेल्वे विभागाने चिंचवड रेल्वे स्थानकावरून 75 पिकअप व्हॅन पहिल्या खेपेत 2139 कि.मी. अंतरावर बांगलादेशच्या बेनापोल येथे पाठवल्या गेल्या. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांचे मार्गदर्शन व अपर मंडल रेल प्रबंधक सहर्ष वाजपेयी यांचे संयोजन व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा आणि वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील निला यांच्या नेतृत्वात वाणिज्य व परिचालन विभागाच्या टीमद्वारे मार्केटिंग करिता करण्यात आलेल्या सक्रिय व संयुक्त प्रयत्नांमुळे व ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांचे सहकार्याने शक्य झाले आहे.