पुणे दि २७:-नारायणगाव पोलीस हद्दीतील कंटेनन्मेट झोन येथे पोलिस पेट्रोलीग करीत असताना नारायणगाव तसेच नाशिक रोड या ठिकाणी असणारे दुकाने कंटेनमेन्ट झोन मध्ये विनापरवानगी तसेच बफर झोन मध्ये प्रांत सो यांच्या आदेशान्वये मास्क न लावता व पाच व पाच पेक्षा अधिक गिऱ्हाईक यांना त्यांची आरोग्याची कोणतेही काळजी न घेता व त्यांना सेनी टायझर तसेच हात पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाही तसेच कंटेनन्मेट झोन तसेच बफर झोन असताना सुद्धा त्याबाबत पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून इसम नामे १) गणेश अशोक पाटे ( महालक्ष्मी हॉटेल) २) अनिल गबाजी यादव ( हॉटेल स्वामी समर्थ) ३) अजित दशरथ मोरे रा.ना.गाव ता. जुन्नर जि.पुणे ( सिध्देश्वर ट्रेडर्स) ४) मुकेश ताजाराम देवासी रा. ना. गाव ता. जुन्नर जि पुणे (नाकोडा स्वीटमार्ट) ५) मोहनिश उल्हास दळवी रा.ना.गाव ता.जुन्नर जि पुणे यांचे वर प्रचलीत कायदान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास स.फौ ढमाले,स. फौ.केंगले, पो.ना.जढर ,पो.ना. जांभळे हे करीत आहे नारायणगाव. गाव पो.स्टे हद्दीत नारायणगाव , वारूळवाडी तसेच ५ कि.मी चा बफर झोन म्हणून मा. प्रांत सोा यांनी घोषीत केला आहे तरी ज्या आस्थापनास मा. प्रांत सो यांनी सवलत दिली आहे अश्या दुकानदार यांना आव्हाहन करण्यात येते की आपल्या दुकानामध्ये काम करणारे कामगार, गिऱ्हाईक, इसम यांनी मास्क लावणे,सेनीटायझर ठेवणे, हात पाय धुण्यासाठी पाणी ठेवणे या व इतर सुचनाचे पालन करावे. असे आव्हान दत्तात्रय गुंड सहा. पोलीस निरीक्षक नारायणगाव पो. स्टेशन यांनी दुकानदारांना केलेे आहे