पिंपरी-चिंचवड दि २५ : -पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा आजच्या रुग्णांच्या संख्येने वाढ झाली आहे.आज शहरात दिवसभरात १०४२ आणि शहराबाहेरील ३७ असे १०७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरातील कोरोनाबधिताची संख्या १५ हजार ६३२ वर पोहचली आहे. तर आज १६ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. दरम्यान,दिलासादायक बाब म्हणजे आज ५७१ रुग्णांना जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पहिला रुग्ण आढळल्या पासून शहरातील रुग्ण नियंत्रणात होती. परंतु मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.जुलै महिना चालू झाल्यापासून आकडेवारी तर अधिक चिंताजनक आहे. मागील काही दिवसांपासून ५०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.पण आज तब्बल १०४२ आणि शहराबाहेरील ३७ अश्या १०७९ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरणाबधिताची संख्या १५६३२ झाली आहे.त्यात दिलासादायक बाब म्हणजे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आज शहरातील ५७१ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १०१५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान आज पिंपळे गुरव येथील ७० वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर पिंपरी येथील ५६ वर्षीय पुरुष, पिंपरीतील ६४ वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरुष , चिंचवडमधील ३८ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय पुरुष, ९५ वर्षीय पुरुष, दापोडीतील ४५ वर्षीय पुरुष, नेहरूनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, चऱ्होलीतील ६७ वर्षीय पुरुष, मोहननगर येथील ६७ वर्षीय पुरुष, म्हाळुंगेतील ३८ वर्षीय पुरुष, विश्रांतवाडी मधील ७२ वर्षीय महिला, मुळशीतील ६८ वर्षीय पुरुष, बालेवाडीतील ८५ वर्षीय पुरुष, मुळशीतील ६८ वर्षीय पुरुष, हिंजवडी मधील ८४ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.त्यामुळे आतापर्यंत शहरातील २७६ जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ७४ अशा ३५० जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात आतापर्यंत १५६३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १०१५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३५६३ सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे २५ लाख इतकी आहे. एखाद्या परिसरात रूग्ण सापडल्यास त्या परिसराचे सर्व्हेक्षण केले जाते. त्या परिसरात पुन्हा काही दिवसांनी रूग्ण सापडल्यास पुन्हा सर्व्हेक्षण केले जाते. मात्र त्या परिसरात दररोज रूग्ण सापडल्यास दररोज सर्व्हेक्षण केले जाते. त्यामुळे सर्व्हेक्षणाची संख्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी