पुणे दि २५ :- बघतोय रिक्षावाला फोरमचे रिक्षाचालकांचे बळी घेतलेल्या लॉकडाउनच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 25 जुलै 2020 रोजी राज्यव्यापी मास्क जाळून निषेध आंदोलन यशस्वीरित्या पार पडले. महोदय लॉक डाऊन च्या काळामध्ये हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेला कोणतेही आर्थिक साहाय्य न देता एक तर्फी लागलेले लॉक डाउन मुळे आर्थिक कुचंबनेला कंटाळून या महिन्यात आठ रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. याकडे शासनाने पूर्ण कानाडोळा केला असून त्याच्या निषेधार्थ लॉक डाऊन चे प्रतीक असलेले मास्क जाळून बघतोय रिक्षावाला फोरमने शनिवार दिनांक 25 जुलै 2020 रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडले. सदर आंदोलनामध्ये राज्यातून 31 जिल्ह्यातून रिक्षाचालक सहभागी झाले. जिथे लोक डाऊन नाही तिथे शहरातील मुख्य चौकात आणि जेथे आहे तेथे घराबाहेर सोशल डिस्टंसिंग च्या सर्व नियमांचे पालन करून निदर्शने करण्यात आली तसेच आरबीआयचे निर्देश पायदळी तुडवून सावकारी पद्धतीने हफ्ते वसूल करून रिक्षाचालकांचा मानसिक छळ करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कागदपत्रांची सुद्धा होळी करण्यात आली. कोरोना लॉक डाऊन च्या काळामध्ये रिक्षाचालकांवर कोसळलेल्या संकटात खाली नमूद केल्याप्रमाणे आमच्या मागण्या आम्ही वेळोवेळी शासनाकडे मांडल्या आहेत.
1) इतर राज्यांप्रमाणे (आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ) महाराष्ट्र शासनाने देखील रिक्षाचालकांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी.
2) लॉक डाऊन काळात व्यवसाय पूर्ण बंद असल्या कारणाने लोनचे हप्ते माफ करावेत
3) वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकांवर नकळत, चोरून, परस्पर कार्यवाही होते ती थांबवावी
4)फायनान्स कंपन्यांकडून RBI ची मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवून रिक्षाचालकांना अरेरावी करत होणारी बेकायदेशीर वसुली थांबवावी.
संकटाच्या कात्रीत सापडलेल्या रिक्षाचालकाला जर शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो. दिल्ली, आंध्रप्रदेश, केरळ सरकार यांनी या बाबींचा विचार करून त्यांच्या राज्यातील रिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य केले आहे. महाराष्ट्रातील शासनाने राज्यातील अनेक संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवून सुद्धा रिक्षाचालकांच्या परिस्थितीची दखल घेतली नाही, उलट महाराष्ट्रातील वाहतूक पोलीस विभाग रिक्षाचालकांवर मनमानी ऑनलाइन कारवाई करत असून त्यांना आवाजवी दंड आकारात आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन छेडत आहोत, तरी कृपया याची आपल्या वृत्तपत्रांमध्ये योग्य ती दखल घेऊन आम्हाला न्याय मिळण्यास मदत करावी ही नम्र विनंती. डॉक्टर केशव क्षीरसागर, अध्यक्ष.श्रीकांत भाऊ चव्हाण, उपाध्यक्ष.