वडगाव दि,०४ :-पुणे वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात रविवार दि. ०३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश प्रताप सिंग (वय ३१ रा. वडगाव मावळ ममता रेसिडसी फ्लॅट न २०६ मूळ गाव उत्तरप्रदेश )यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आसून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिंग यांनी त्यांची एम एच १४ जी.डब्लु यु ७९६५ ही दुचाकी वडगाव येथील विशाल लाॅन्स जवळ असलेली ममता रेसिडसी संकुलाच्या पार्कीग ला पार्क केली होती. काळ्या रंगाची हिरो होडा स्पेडरचे हॅडल लाॅक तोडुन.अज्ञात चोरट्याने सिंग यांची दुचाकी चोरून नेली.आहे.पुढील तपास वडगाव मावळ पोलिस निरीक्षक निंबाळकर करत आहे.
सतिश सदाशिव गाडे.वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी