पुणे, दि, १२ : – हरित मित्र परिवारातर्फे वरखंडा येथील शांतिकुमार आदिवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना दहा हजार चंदन आणि 20 अशोकाच्या रोपांचे वाटप परिवाराचे अध्यक्ष डॉ, महेंद्र घागरे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक संतोष पांगी, उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय शिंदे आणि विदयार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, यावेळी अशोकाच्या रोपांची लागवड करण्यात आली,आदिवासी विदार्थानी भर पावसात अशोकाच्या रोपांची लागवड करून शासनाच्या 33 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला, अशी माहिती दत्तात्रय शिंदे यांनी दिली,आजपर्यंत शाळेच्या आवारात व विदार्थानी घराच्या परिसरात लावलेली रोपे शंभर टक्के जंगली आहेत, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास पागी यांनी व्यक्त केला, घागरे यांच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले,