पुणे दि, १२ :- पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या संघटनेमध्ये विविध सेलमध्ये बदल करण्यात आलेले आहेत
पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे महिला युवक विद्यार्थी युवती अल्पसंख्यांक कामगार अशा समाजातील विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी संघटना व सेल आहेत या संघटनाच्या अध्यक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नवीन नेमणुका करण्यात आल्याची घोषणा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आदरणीय नेते अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या नेमणुका करण्यात आल्या या नेमणुका करत असताना पूर्वीच्या संघटनेच्या व सेलच्या शहराध्यक्ष यांना त्याच्या विभागाच्या प्रदेश कार्यकारणी मध्ये प्रमोशन देण्यात आलं तसेच काही लोकांना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी मध्ये बढती देण्यात आली त्यामुळे पूर्वीच्या संघटनेच्या शहराध्यक्षांचा केलेल्या कामाचा अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र प्रदेश पातळीवरती पक्षाला होईल व नवीन चेहऱ्यामुळे संघटना बांधणी अधिक मजबूत करता येईल त्याच प्रमाणे या नेमणुका करताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे धोरण पक्षाने अवलंबिले आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील आठवी विधानसभा मतदारसंघाचा ताळमेळ नियुक्त करताना बसवलेला आहे अशी माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली
नवनिर्वाचित अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणे
राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वाती पोकळे
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महेश हांडे
राष्ट्रवादी विद्यार्थी विशाल मोरे
राष्ट्रवादी युवती काँग्रेस अश्विनी परेरा
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेस अजीम गुडाकुवाला
राष्ट्रवादी कांग्रेस कामगार सेल राजेंद्र कोंडे
राष्ट्रवादी काँग्रेस पर्यावरण सेल समीर निकम
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेल प्रमोद रणवरे
राष्ट्रवादी काँग्रेस आयटी सेल ययाती चरवड
राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल शंकर शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल सुकेश पासलकर
राष्ट्रवादी काँग्रेस पथारी सेल अल्ताफ शेख
.