पुणे,दि.२१:- पुण्यातील ग्रिन विधातेवस्ती बाणेर येथे उभ्या असलेल्या पोखलेन मधील कंट्रोलबॉल सेट, डिजेल, हायड्रोलिक ऑईल असा ८ लाख ५८ हजार ३०० रूपयांचे ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले.या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांत तक्रार दाखल. करण्यात आली.सविस्तर माहिती बाणेर येथील नवनाथ बालवडकर, वय ३१ वर्ष रा. बालेवाडी पुणे यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोखलेन. मधील इसमाने ८ लाख किंमतीचे कंट्रोलबॉल सेट, २७ हजार रुपये किंमतीचे डिजेल, ३२ हजार रुपये किंमतीचे हायड्रोलिक ऑईल असे एकुण ८ लाख ५९ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेला आहे.व पुढील तपास सहा. पो. फौज. दिनेश गडांकुश करीत आहे