पुणे,दि.२१:- पुण्यातील मार्केटयार्डामधील आंबेडकरनगर येथे कोयते, तलवारी घेऊन धाक दाखवत पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविणार्या टोळक्याने वअल्पवयीन मुलांनी कोयते व तलवारी नाचवत मोटारसायकली व हातगाडीची तोडफोड केली.याप्रकरणी इस्माईल अयाज शेख (वय ३२, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकरनगरमधील सहा ते सात अल्पवयीन मुले गुरुवारी रात्री
दहा वाजता गल्ली नंबर १६ मध्ये कोयते व तलवारी नाचवत लोकांना दुकाने बंद करायला लावण्याची धमकी देत फिरत होते. त्यांनी लोकांच्या ७ मोटारसायकली व एका हातगाडीवर कोयत्याने व तलवारीने वार करुन १० हजार ५०० रूपय पेक्षा जास्त नुकसान केली आहे. लोकांमध्ये दहशत पसरवून ते निघून गेले.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.