पुणे,दि.२०: – पुणे शहर पोलीसांच्या वतीने 19 जानेवारी रोजी रात्री 9 ते 20 जानेवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन राबवले आहे. यामध्ये 3 हजार 683 गुन्हेगारांची पुणे शहरात आरोपींचा तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 709 गुन्हेगार मिळून आल्याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
कोबिंग ऑपरेशन अंतर्गत गुन्हे शाखेने 13 केसेस व पुणे पोलिस स्टेशनने 24 केसेस अशा एकूण 37 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 27 कोयते, दोन चाकु, तीन तलवार, एक कुऱ्हाड व तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस स्टेशनकडून नाकाबंदी दरम्यान एक हजार 446 संशयित वाहन चालकांची तपासणी करुन 32 जणांवर 20 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणयात आली आहे. तर, वाहतूक शाखेकडून एक हजार 22 संशयित वाहन चालकांना चेक करुन 115 जणांवर 75 हजार 800 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
यापुढेही कोंम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे शहर पोलीसांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे एकूण आठ तडीपार गुन्हेगारांवर देखील कारवाई केली गेली. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण 532 हॉटेल, ढाबे, व लॉजेस चेक तसेच 171 एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे तपासणी करण्यात आली आहे.
• आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हे शाखेने १३ केसेस व पोलीस स्टेशनने २४ केसेस करुन त्यामध्ये एकुण ३७ आरोपींना अटक करुन त्यांचे ताब्यातुन २७ कोयते रु.८,४००/- २ चाकु रु.४००/-, २ सुरा रु.४००/-, ३ तलवार रु.२,५००/-, १ कु-हाड रु.२५०/- व ३ दुचाकी रु. १,१३,०००/-कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> युनिट १ – स्वारगेट पो.स्टे.गु.र.न. २६७/२०२२ क ३९९ मधील आरोपी नामे योगेश गणेश माने, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे अटक करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> युनिट २ – विमानतळ पो.स्टे.गु.र.न. ३६ / २०२३ क ५०४, ५०६, ३४ सावकारी अधि सन १४ क ३९,४५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी नामे दुर्गेश कुमार पांडे, वय ३३ रा. हडपसर पुणे यास अटक करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> युनिट ५ – कोंढवा पो.स्टे.गु.र.न. १८३/२०२२ क ३२४, ३२३, ५०४,३४ या गुन्हयातील आरोपी नामे अर्जुन तुकाराम पवार, वय २०, रा. कोंढवा पुणे यास अटक करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> युनिट ६ – हडपसर पो.स्टे.गु.र.न. १४०२/२०२२ क ३२४, ३३७, ५०४, ५०६, ३४ या गुन्हयातील आरोपी नामे १) संग्राम भगवान थोरात, वय २८, रा. कवडीपार, हवेली, पुणे २) प्रेम तानाजी गायकवाड वय १७ रा. कवडीपार, हवेली, पुणे यास अटक करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> दरोडा व वाहनचोरी पथक १ चतुश्रृंगी पोस्टे गु.र.न.८९/२०२१ क ३०७,३५३,३३२,३२३, ५०४, रायट – या गुन्हयातील पाहिजे आरोपी एकनाथ ऊर्फ एक्कया ऊर्फ राजु जाणिया धानावत, वय २६, रा. लमानतांडा, पाषाण पुणे यास पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> खंडणी विरोधी पथक १ चतुश्रृंगी पोस्टे गु.र.न. ५९/२०२३ क १८८, २७२, २७३,३२८ व अन्न सुरक्षा – मानके का ०६ चे क ३० / २ /अ, ३१/१,२६ / २ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी सुरेश किसन कलाधर, वय ५९, रा. १००१, वडारवाडी, पुणे याचेकडुन रु. ४,२२,०४८/- रु. कि.चा. विमल पान मसाला व इतर साहित्य जप्त करुन त्यास पोलीस स्टेशन ताब्यात दिले..
> अंमली पदार्थ विरोधी पथक १- कोंढवा ७२ / २०२३ पोस्टे येथे एनडीपीएस अॅ. क ८ (क), २१ (ब). २९ प्रमाणे दाखल करुन आरोपी नामे १) बेका हमीस फॉऊमी, वय ४६, रा. कोंढवा, पुणे २) अरशद अहमद इकबाल व ४२ रा. कोंढवा पुणे यांचेकडुन ३६ ग्रॅम ९२० मिलीग्रॅम कोकेन रु. ७,३८,४००/- २ मोबाईल रु. २०,०००/- व प्लॅस्टिक डब्या रु. २०० कि.चा. मुद्देमाल जप्त करुन आरोपीस पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> अंमली पदार्थ विरोधी पथक २ – कोंढवा पोस्टे गु.र.न. ७९ / २०२३ सिगारेट व अन्य तंबाखजन्य उत्पादने अधि १८ चे क ४अ २१ अ प्रमाणे हुक्का पार्लरवर छापा टाकुन एकुण रु. १०,२०० /- चे २ हुक्का पॉट, १ चीलीम, २ हुक्का पाईप, हुक्का पॉटस व इतर साहित्य जप्त करुन हॉटेल मालक नामे प्रकाशसिंग नरसिंग चौहान, वय ३९ रा. कोंढवा, पुणे यास अटक करुन पोलीस स्टेशन ताब्यात दिले.
> परिमंडळ – १- समर्थ पो.स्टे. गु.र.नं. ६१५/२०२० क ४६५, ४६७, ४६८, ४७१,४७२, ४१९, ४२०,३४ या गुन्हयातील आरोपी अजय गुलाब गायकवाड, वय ३१, रा. कुंजीरवाडी, पुणे यास अटक करण्यात आले आहे.
> परिमंडळ – २ – लष्कर पो.स्टे.गु.र.नं. १०/२०२३ एनडीपीएस या गुन्हयातील आरोपी इम्रान लतीफ शेख रा. बाबाजान चौक, कॅम्प, पुणे याचेकडुन २७ ग्रॅम गांजा रु.१,६००/- कि.चा. मुद्देमाल जप्त करुन त्यास अटक करण्यात आले आहे.
> परिमंडळ – २ – सहकारनगर पो.स्टे.गु.र.नं. २२/२०२३ क ३८०, ३४ या गुन्हयातील आरोपी १ ) विशाल नलावडे, रा. आंबेगाव पुणे २) गणेश इंदलकर, वय २३, रा. आंबेगाव पुणे ३) प्रतिक गायकवाड, रा. आंबेगाव पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – २ – स्वारगेट पो.स्टे.गु.र.नं. २०/२०२३ क ३०७ या गुन्हयातील आरोपी सुरेश कोळी, रा.
पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – २ – भारती विदयापीठ पो.स्टे. गु.र.नं. ४३३/२०२१ क रायट या गुन्हयातील आरोपी आफ्रिदी शेख, वय २४, रा. कोंढवा पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – २ भारती विदयापीठ पो.स्टे. गु.र.नं. ६२१ / २०२२ महा. जुगार अॅ १२ अ मधील आरोपी
संतोष राठोड, रा. कोंढवा पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – ३ कोथरुड पो.स्टे. गु.र.नं. ५०/२०२१ क ३९५ मोका व ३६९ / २०१९ क ३०७ या गुन्हयातील पाहिजे आरोपी कुणाल कंधारे, वय २७, रा. कोथरुड, पुणे यास अटक करण्यात आले…
> परिमंडळ – ३ वारजे पो.स्टे.गु.र.नं. ८८/२०१८ क ४२० या गुन्हयातील आरोपी सचिन बराटे, रा. वारजे पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – ३ – वारजे पो.स्टे.गु.र.नं. २१५/२०२२ क ३७६ / २ या गुन्हयातील आरोपी निलेश चव्हाण, वय ३२, रा. कर्वेनगर, पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – ४ – चतुश्रृंगी पो.स्टे.गु.र.नं. ५६ / २०२३ क ३२४.५०४ मधील दत्ता भाऊराव राऊत, वय ३०, रा. बालेवाडी, पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – ४ – चंदननगर पो.स्टे.गु.र.नं. ३५८/२०२२ क ४२०, ४०६ ४०९ मधील रामकृष्ण ऊर्फ राजेश गोविंदस्वामी पिल्ले, वय ५६, रा. पिंपरी, पुणे यास अटक करण्यात आले.
> परिमंडळ – ५- मुंढवा पो.स्टे.गु.र.नं. ३१/२०२३ एनडीपीएस अॅ.क. ८क, २७ प्रमाणे दाखल करुन आकाश कोळेकर, रा. मांजरी, पुणे यांचेकडुन १० हिरवट रंगाची पाने व बिया रु.१०/- कि.चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> परिमंडळ – ५ – कोंढवा पो.स्टे. ७६ / २०२३ एनडीपीएस अॅ.क.८क, २०ब २अ प्रमाणे गुन्हा दाखल करुन
आरोपी नामे आसीफ आतीक मेमन वय २२ रा. कोंढवा, पुणे यांचे कडुन ५९७ ग्रॅम गांजा रु.८,९५५/- कि.चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> परिमंडळ – ५- मार्केटयार्ड २३ / २०२३ एनडीपीएस क ८क, २०ब २ब प्रमाणे गुन्हा दाखल करुन चाँद शेख व इतर त्याचे साथीदार यांचेकडुन १ किलो ९२० ग्रॅम गांजा रु. ३७,६००/-, १ मारुती सुझुकी रु. ५०,०००/-, ४ मोबाईल रु. २०,०००/-, कि.चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> परिमंडळ – ५ बिबवेवाडी पो.स्टे. ०६/२०१८ क १४३, १४७, १४९, १५३, ३३६, ३४१, ३३७, ४२७ मधील
आरोपी मैसा किसन वाघमारे, वय ५७, रा. बिबवेवाडी, पुणे यास अटक करण्यात आले.
> शिवाजीनगर, विश्रामबाग, सहकारगनर, स्वारगेट भारती विदयापीठ, वारजे माळवाडी, दत्तवाडी, खडकी, चतुश्रृंगी चंदननगर, येरवडा, हडपसर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी व लोणी काळभोर पोलीस स्टेशनने बेलेबल व नॉन बेलेबल वारंट बजावणी उत्कृष्ठपणे केलेली आहे.
> मुंबई प्रोव्हिबीशन अॅक्ट प्रमाणे गुन्हे शाखेने १२ केसेस व पोलीस स्टेशनने ५८ केसेस करुन गावठी
दारु व विदेशी बॉटल रु. ५६,९२५/- व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. > महा. जुगार अॅक्ट प्रमाणे गुन्हे शाखेने ३ व पोलीस स्टेशनने १८ केसेस करुन त्यामध्ये ३४ आरोपींना अटक करुन जुगार साहित्य व रोख रु. ८९.५८०/- कि.चा. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
> सीआरपीसी कायदा प्रमाणे एकुण ७८ आरोपींविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
> तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १४२ प्रमाणे गुन्हे शाखेने ३ व पोलीस स्टेशनने ५ असे एकुण ८
तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे.
> पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकुण ५३२ हॉटेल, ढाबे व लॉजेस चेक, तसेच १७१ एस टी स्टॅण्ड / रेल्वे स्थानक / निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले आहे.
> पोलीस स्टेशनकडुन नाकाबंदी दरम्यान १४४६ संशयित वाहन चालकांना चेक करुन ३२ जणांवर रु.
२०,४००/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. > वाहतुक शाखेकडून १०२२ संशयित वाहन चालकांना चेक करुन ११५ जणावर रु. ७५,८००/- ची
दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांचे आदेशान्वये पोलीस सहआयुक्त, संदीप कर्णिक, पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग.रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, सुहेल शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ४, शशिकांत बोराटे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ -५, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक विभाग, विजयकुमार मगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी, अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी, अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे. यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.