लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील गावांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त शेतकर्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करून घ्यावे. ज्या बँका कामात कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. पीक वाया गेले आहे. रब्बीचीही 50 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शेतकर्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा अग्रणी बँकेने पाठपुरावा करावा. पीक विमा योजनेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्त्वाची भूमिका आहे. सर्व बँकांनी जबाबदारी समजून घेऊन शासन निर्देशाप्रमाणे काम करावे. जाणिवपूर्वक टाळाटाळ करणार्या बँकांवर कारवाई केली जाईल.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साबळे म्हणाले, दुष्काळी स्थितीमुळे खरीप हंगामाची पिके वाया गेली आहेत. रब्बी क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना लाभार्थी खातेदारांपर्यंत पोहोचून त्यांना लाभमिळवून देणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात साधारणत: 5 लाख 37 हजार खातेदार आहेत. त्यांची सभासद संख्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त आहे. खासगी बँकांचा प्रतिसाद यामध्ये काहीसा कमी पडत आहे. त्यांनी पीक विमा योजनेत आपला सहभाग वाढवणे आवश्यक आहे.