पुणे दि १४ :- सध्या मुला,मुलींचे लग्न जुळविणे कठीण होऊन बसले आहे लग्न जमले तर काही वधू वरांचे घटस्फोटीत चे प्रमाण वाढ झाली आहे? हवे तसे स्थळ मिळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. याचा गैरफायदा घेत काही व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व काही वेबसाईट वर मुला मुलींची बोगस माहिती देवून नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.काही वधुवर मेळाव्यातील पुस्तक हे सर्वांना ऊपलब्ध आसते व कोनतीही चौकशी नकरता ते पुस्तक ५०० ते १००० रूपया ईजी विकत मिळते व हे पुस्तक विकत घेऊन व व्हॉट्सअॅप व वधु वर ग्रुपमध्ये लिंकच्या माध्यमातून एड होऊन त्यातील माहिती चा बायडेटातील काही सुंदर मुलीच्या व मुंलाचा वेगवेगळ्या बायडेटा तयार केल्या जात असल्याचेही माहिती समोर आली आहे.
नांदेड,नागपूर,औरंगाबाद, बुलढाणा व ईतर शहरातील हे काही वधू वर सूचक केंद्र व संस्थेच्या नावाने फोन करून मनासारखे स्थळ आम्ही आपल्याला मिळवून देऊ असे फोन करून माहिती देतात व अशा मुला मुलीच्या घरातील नातेवाईकांना आपल्या चांगले स्थळ मिळावे सर्वांचीच इच्छा असते. काही बोगस वधू -वर सूचक केंद्र याचा आधार घेवून वधुवर मेळाव्यातील स्टॉल वर जाऊन पुस्तके विकत घेतली जातात काही वधु वर पुस्तक व व्हॉट्सअॅप मधून हे नावे व मोबाईल नंबर हे काही बोगस वधू -वर सूचक केंद्र हे मिळवत आहेत.
जात, धर्म, शिक्षण, व्यवसाय, अपेक्षा व राहण्याचे ठिकाण काही वधु वर पुस्तक व व्हॉट्सअॅप मधून हे ईजी मिळत आसल्याने व वधु वरांचे पद्धतशिरपणे मिळती जुळती माहिती बायडेटा तयार केला जात आहे. वधु वरांच्या नातेवाईकांना पुणे,मुंबई सातारा,सांगली,कोल्हापूर व ईतर ठिकाणी स्थळ असल्याचे सांगण्यात येत आहे.पहिल्याधा फोन वर किंवा व्हॉट्सअॅप मधून त्या वधु वरांचे बायडेटा वर फक्त त्या वधु वरांचे नाव, तिची अर्धवट माहिती वधुवरांच्या नातेवाईकांना देण्यात येते व पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर न देता अपुरी माहिती दिली जात आहे.व खात्री पटवण्यासाठी त्याच्या कार्यालयातून फोन वर वधु किंवा वरांच्या नातेवाईकांना आम्ही आपल्या मोबाईल कॉन्फरन्स बोलने करून देतो आसे भास करून मुलांच्या किवा मुलीची नातेवाईकाना बोलने करून देतो व त्यांच्या पेकी एक जन कॉन्फरन्स फोनवरुन बोलतो व वधु किंवा वराची संपूर्ण माहिती सांगत आसताना मधीच फोन कट होतो व कॉन्फरन्स आसलेला प्रतिनिधी सांगतो कि आपण संपूर्ण फी भरल्यानंतरच सर्व माहिती आपल्या देण्यात येईल अशी अट घालण्यात येते
लग्न ठरत आसल्याने वधु किंवा वर हे स्थळ रूपवान व घरदार चांगले मिळत असल्याने वधु किंवा वर यांच्या नातेवाईकांना ४००० ते १०००० रूपये भरण्यास भाग पाडतात त्यासाठी नांदेड ,नागपूर, औरंगाबाद, बुलढाणा व ईतर ठिकाणचा बँकेचा अकौंट नंबर दिला जातो . एकदा का ते पैसे खात्यावर जमा झाले की फोन केला कि वधु किंवा वर यांच्या नातेवाईकांना मोबाईल वरून वधु किंवा वरांचे घरचे काही कारण सांगितले जाते व उडवाउडवीचे उत्तर मिळते किंवा मोबाईल बंद लागतो.
बँकेत चौकशी केली असता ते खाते बंद झाले आहेे किंवा बोगस नावाने असलेल्याचे कळते.अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या टोळीकडून लग्न जुळविण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेकजण याला बळी पडले आहेत. लग्न ठरणे दूरच पण पैसे गेले, मानसिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच. अब्रुन जाण्याचा भितीने वधूच्या किंवा वरांच्या नातेवाईक याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करत नसल्याने या टोळीकडून चांगलेच फावले आहे व वधूच्या किंवा वरांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात आहे.
आपल्या परिसरात जर काही चालू घडामोडी असेल तर आम्हाला जरूर कळवा
आमचा व्हाट्सअप नंबर :- 7744995591
सर्वसामान्यांचा हक्काचा न्यूज चॅनेल
झुंजार न्यूज चॅनेल
संपादक संतोष राम काळे
पुणे