पुणे, दि.१३ :- पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील विशेषता पर्वती दर्शन, शिवदर्शन, दत्तवाडी, एरंडवणा, हेल्थ कॅम्प, जनवाडी, भवानी पेठ येथील नागरीकांनी महसुल मंत्री यांच्या दि.15 जुन 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने तसेच पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या दि.7 डिसेंबर 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांच्या मिळकत पत्रिकांमध्ये शासनाकडील अनुदानीत आदेशामधील क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद झाली आहे अशा मिळकत पत्रिकेवरील संबधीतांनी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख पुणे यांच्या कार्यालयातअर्ज सादर केल्यास दुरुस्तीची कार्यवाही अवलंबणेत येईल, संपर्कासाठी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख, पुणे बंगला नं.1, एअरपोर्ट रोड,समता नगर, बदामी चौक, येरवडा, पोस्ट ऑफिसच्या मागे, येरवडा पुणे, इमेल आयडी dslr.pu_mh@gov.in, dslr_pune@yahoo.in ,दुरध्वनी क्र.०२०-२६६८४६५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख राजेंद्र गोळे यांनी केले.