पुणे,दि.26 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे कार्यालयातील 5 कर्मचाऱ्यांना कोव्हीड-19 सदृश्य लक्षणे दिसून आल्याने कोव्हीड-19 चाचणी करण्यात आली असून एक कर्मचारी पॉझीटिव्ह असून इतर 4 कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल मिळाले नाहीत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या माजी सैनिक तसेच कामासाठी येणा-यांची गर्दी पाहता कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून कुणाच्याही संपर्कात न येणाच्या व लक्षणे दिसताच तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वरील परिस्थिती तसेच कामानिमित्त कार्यालयास जिल्ह्याच्या वेगवेगळया भागातून येणाऱ्या माजी सैनिक तसेच कामासाठी येणारांची संख्या पाहता कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयीन कामकाज 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. तरी कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी कळविले आहे.