पुणे दि २४ :- उत्तेजक द्रव्याची विक्री साठी आणलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट -२ ने घेतले ताब्यात दि२२ रोजी गुन्हे शाखेकडील युनिट -२ अधिकारी व स्टाफ पुणे स्वारगेट हद्दीत पेट्रोलींग करत असताना पो.हवा . नामदेव रेणुसे यांना गोपनीय खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की , स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत पौर्णिमा टॉवर्स जवळ एक इसम उत्तेजक औषधाची बेकायदेशिर विक्री करायला येणार आहे . सदर माहीती वरुन युनिट -२ च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचुन बेकायदेशिर औषध विक्री करण्यासाठी आलेला आरोपी रोहन प्रल्हाद लोंढे वय २९ वर्षे रा . हडपसर पुणे .यास पोलिसांनी ताब्यात घेतले असताना त्याचेकडे उत्तेजक द्रव्य औषध मेफेनटरमाईन सल्फेट १० एम.एल.च्या १६ बॉटलस् मिळुन आल्या . सदरचे औषध बाळगण्याबाबत त्याचेकडे कोणताही परवाना अगर डॉक्टरांची शिफारस मिळाली नाही . सदर औषधे डॉक्टरचे प्रिस्क्रीप्शनव्दाराच विक्री करणे बंधनकारक आहे . सदर औषधाचा वापर हृदयरोग व लो ब्लड प्रेशर या आजारासाठी केला जातो . परंतु सदर औषधे डॉक्टरांचे शिफारशी शिवाय औषधाचा मुळ गुणधर्म माहीत नसताना जिम मध्ये बॉडी बिल्डींग करणाऱ्या मुलांना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमतीने विक्री करत असल्याचे आरोपीने सांगीतले . सदरचे औषध अती सेवन करणाऱ्या व्यक्तीला औषधाचे व्यसन लागते . आरोपीस ताब्यात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे शहर यांचे सहाय्याने पुढील कारवाई करण्यात आली . अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सौ शामल महींद्रकर यांनी सदर आरोपी विरुध्द कारवाई होणेकरीता स्वारगेट पोलीस स्टेशन येथे फर्याद दिली आहे . सदर गुन्हयात सहभागी इतर आरोपींबाबत तपास गुन्हे शाखा युनिट -२ पुणे शहर करत आहे . सदरची कामगिरी बाबत अपर पोलीस आयुक्त , अशोक मोराळे . पोलीस उप आयुक्त गुन्हे बच्चन सिंग , सहा . पोलीस आयुक्त गुन्हे सुरेंद्र देशमुख , यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे . सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट -२ चे पो.निरी . महेंद्र जगताप , सपोनि जयवंत जाधव , पो.हवा . नामदेव रेणुसे , पोलीस नाईक उत्तम तारु , पो.शि. मितेश चोरमोले , यांनी केली आहे .