पुणे दि १३ :- हैदराबाद येथून विमानाने पुण्यात येवून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या जाळ्यात पुणे शहरात वारंवार वाढणा – या घरफोडी चोरीच्या गुन्हयाबाबत मा . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार युनिट – ५ कडील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करणेबाबत आदेशित करण्यात आलेले होते . त्यानुसार दिनांक २१ जानेवारी रोजी युनिटकडील सपोनि तासगांवकर , पो . हवा . रणसिंग व मोहिते यांना मिळालेल्या माहितीवरुन पुणे , मुंबई नाशिक , नागपुर तसेच भारतातील इतर राज्यातील शहरांत घरफोडी करणार रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे : – मुन्ना ऊर्फ सलीम कुरेशी रा . गोवंडी मुंबई सध्या – हैद्राबाद हा मे – २०१८ मध्ये जेलमधुन सुटलेला होता . त्यानंतर तो महाराष्ट्रातील विविध शहरात व इतर राज्यात विमानाने व कधी त्याचेजवळील कारने येऊन घरफोडी चो – या करुन पोलीसांना गुंगारा देऊन पळुन जात होता . त्यानुसार सदर आरोपीचे अभिलेखावरील सर्व पत्त्यावर जाऊन त्याचेबाबत
माहिती काढण्यासाठी वेगवेगळया टिम तयार करण्यात आल्या व त्यांचे मार्फतीने त्याचेबाबत पुर्ण माहिती जमा केली . तसेच आरोपीचे पुर्वीच्या गुन्हयातील जामीनदार तसेच त्याचे जवळचे नातेवाईक यांचेकडुन देखील माहिती जमा केली . त्यामध्ये सदरचा आरोपी हा कधी विमानाने व कधी त्याचेकडील काळे रंगाची लॅन्सर कार नं . एम एच / ०२ / ओ . क्यु – ०२०१ हिने विविध शहरात घरफोडी चोरी करतो अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती .व पुणे शहरातील काही ठिकाणचे सी . सी . टि . व्ही . फुटेजही प्राप्त झाले होते . त्यानुसार सदरचा आरोपी त्याचे गाडीमधुन विमानतळ परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती . त्यानुसार दि २१ जानेवारी रोजी युनिटकडील सपोनि तासगांवकर , पोउनि शेंडगे व उपलब्ध स्टाफ यांचेमार्फतीने सापळा लावला असता विमानतळ येथील संजय पार्ककडे जाणारे रोडवर काळे रंगाची लॅन्सर कार नं . एम एच / ०२ / ओ क्यु ०२०१ ही फिरतांना आढळून आली . त्यावेळी सदर वाहनांचा पाठलाग करुन पोलिसांनी खाजगी वाहन आडवे घालून थांबवून स्टाफचे मदतीने सदर वाहन व चालक यास ताब्यात घेण्यात आले व त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव सलीम अली हुसेन खान ऊर्फ मुन्ना कुरेशी ऊर्फ मोहमंद हमीद हबीब कुरेशी , क्य ४६ वर्षे , धंदा – काही नाही , मूळ रा . टाटानगर झोपडपटटी , देवनार कत्तलखाना मेनगेटसमोर , अनामत हॉटेलमागे , गोवंडी , मुंबई – ४३ व सध्या रा . सदात रेसिडेन्सी प्लॅट नं . ५०१ , राघव कॉलनी , सेवन टॉवन रोड , टोली चौकी , हैद्राबाद असे सांगितले . त्याचेकडे अधिक तपास करता तो हैद्राबाद येथुन पुणे येथे काही वेळा विमानाने प्रवास करुन व काही वेळा त्याचेकडील कारमधुन येऊन त्याचे इतर साथीदारांसोबत पुणे शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणाची टेहळणी करीत असे , त्यानंतर त्याचेकडील घरफोडी करण्याचे साहित्य वापरुन घरफोड्या चो – या करत असत . चोरी केलेला मुद्देमाल यातील आरोपी त्याचे हस्तका मार्फत अथवा स्वतः हैद्राबाद येथे घेऊन जात असे . तपासा दरम्यान त्याचा साथीदार नामे ईश्वर ऊर्फ चिंटया शिंदेवळ रा . शनी आळी , स . नं . १० , मॅथाडिस्ट चर्च जवळ , येरवडा , पुणे – ६ यास देखील अटक केली आहे . सदर घरफोडीच्या मुद्देमालाबाबत त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने तो मुद्देमाल त्याचे हैद्राबाद येथील नातेवाईक व मित्रांचे मार्फतीने हैद्राबाद येथेच विक्री केल्याचे सांगितले . त्यानुसार युनिट – ५ , गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांची एक टिम तयार करुन हैद्राबाद येथे पाठवुन सदर मुद्देमाल ज्या नातेवाईक व मित्रांचे मार्फतीने विकला होता अशा एकुण ०५ रिसीव्हर आरोपी नामे १ ) शरीफ मोहंमद ख्वाजा मैनुद्यीन शेख २ ) बिलाल ऊर्फ अशोक गोविंद्र प्रधान ३ ) अब्दुल सत्तार मोहम्मद नजीर अहमद सत्तार ४ ) मोघल अन्वर अली करीम बेग ५ ) प्रभु कल्लाप्पा नंजवडे सर्व राहणार हैद्राबाद यांना देखील अटक केली आहे . सदर आरोपी व रिसीव्हर यांचेकडुन आजपावेतो ८३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने व ६ किलो २७५ ग्रॅम वजनाचे वेगवेगळे चांदीचे दागिने असा एकुण ३६ लाख ९१ हजार,६५० रु . कि . चा . मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . आरोपीने आज पावेतो केलेल्या तपासामध्ये एकुण ७२ गुन्हे केल्याचे उघड झाल्याने तपासात आजपावेतो जप्त केलेला मुद्देमाल हा एकुण १२७ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे . त्यामध्ये पुणे शहरातील ८२ व महाराष्ट्रातील नाशिक , नागपुर मुंबई , नवी मुंबई , ठाणे , व इतर राज्यातील ४५ अशा गुन्हयांचा समावेश आहे . तपासात आजपावेतो जप्त केलेला मुददेमाल हा पुणे शहरातील एकुण ४० गुन्हयातील असुन उर्वरीत गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यासाठी युनिटकडील टिम प्रयत्न करीत आहे . सदरचा मुद्देमाल हा तेलगाणा राज्यातील हैद्राबाद व इतरत्र विकला असल्याने तसेच यातील सर्व आरोपी हे तेलगाणा राज्यातील हैद्राबाद मधील असल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडुन मुद्देमाल जप्त करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या . तरी देखील युनिट – ५ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत कौशल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडुन सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे . सदरची कारवाई ही मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर श्री . अशोक मोराळे साो , मा . पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे शहर श्री . बच्चन सिंह सो , मा . सहा . पोलिस आयुक्त , प्रतिबंधक , श्री . शिवाजी पवार साो , मा . सहा . पोलीस आयुक्त , अभियोग , पुणे शहर , श्री . विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली युनिट – ५ चे प्रभारी अधिकारी वपोनि श्री . दत्ता चव्हाण , स . पो . निरी . संतोष तासगांवकर , पो . उप . नि . शेंडगे , पोलीस स्टाफ संतोष मोहिते , प्रदीप सुर्वे , राजेश रणसिंग , दत्ता काटम , राजाभाऊ भोरडे , बंडु शिंदे , संजय देशमुख , अमजद पठाण , महेश वाघमारे , प्रविण काळभोर , अश्रुबा मोराळे , सचिन घोलप , दया शेगर , अंकुश जोगदंडे , मपोशि स्नेहल जाधव , संजयकुमार दळवी यांनी ही कामगिरी केलेली आहे .