मुंबई दि १२ : -मनसेचा ९ फेब्रुवारीला पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाच्या बाहेर काढा, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. या भव्यदिव्य मोर्चानंतर मुंबईत आता बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेत धरपड सुरू झाली.आहे मुंबईच्या विरार भागात पोलिसांनी कारवाई करत २३ बांगलादेशी महिला व पुरूषांना अटक केली आहे.
विरारमधील अर्नाळा पोलिसांनी ही कारवाई केली. विरारमधील अर्नाळा, कळंब, राजोडी या परिसरातून २३ बांगलादेशींना अटक करण्यात आली असून अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवादविरोधी पथक व अर्नाळा पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी (ता. ११) मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.या बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात १० महिला, १२ पुरुष व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.सध्या सीएए, एनआरसी विरोधात देशात आंदोलने होत असताना. मनसेने या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा चंगच बांधला आहे. यासह भाजपनेही रत्नागिरीत पर्यटन व्हिसा घेऊन राहणाऱ्या बांगलादेशींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.