पुणे दि १०:- पुणे फरासखाना पोलीसांनी दोन सराईत वाहनचोरांना अटक करून १४ लाख रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला आहे व फरासखाना पोलीस पथकाचे प्रभारी अधिकारी व तपास पथकातील कर्मचारीहे फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयांना प्रतिबंध घालण्याचे अनुषंगाने पेट्रोलींगकरीत असतांना पोलीस कर्मचारी शंकर कुंभार यांना गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की , इसम नामे १ ) संतोष विष्णु नागरे , वय २५ वर्षे , धंदा – काहीनाही रा . सध्या रा . गुरुदत्त कॉलनी लेन नं . ७ दत्त मंदीराजवळ भेकराईनगर हडपसर पुणे मुळ रा . मु . पो . सोनोशी , ता . सिंदखेड राजा जि . बुलढाण व २ ) सागर शरद समगीर वय २८ वर्षे धंदा मोबाईल शॉपी मुळ रा . मु . पो . वीरता . पुरंधर जि . पुणे हे चोरीची दुचाकी विक्रीकरण्यासाठी नाना पेठ येथे येणार आहेत व दुध भट्टी गणेश पेठ येथे पोलिसांनी सापळा
लावुन आरोपींना शिताफीने पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला व पोलिसांनी त्यांना खाकीचा हिसका दाखवल्यानंतर ते पोपटा सारखे बोलूलागले गाड्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे व त्यांनी पुणे शहर व परिसरातुन अंदाजे किंमत रुपये १४ लाख रुपयेचे एकुण २० दुचाकी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे . सदरची वाहने१ ) फरासखाना २ ) विमानतळ ३ ) हडपसर ४ ) कोंढवा ५ ) विश्रांतवाडी ६ ) सासवड लोणीकद पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयातील निष्पन्न झाली आहेत . तसेच इतर वाहनांबाबत तपास चालु आहे . सदरची कारवाई मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे , डॉ . श्री . संजय शिंदे सोा , पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ पुणे श्रीमती स्वप्ना गोरे , सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री प्रदीप आफळे यांचे मार्गदर्शनाखाली यांचे श्री . जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , दादासाहेब गायकवाड , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , पोलीस उप निरीक्षक प्रमोद हंबीर , यशपाल सुर्यवंशी , पोहवा बापु खुटवड , सयाजी चव्हाण , केदार आढाव , पोलीस नाईक शंकर कुंभार , विकास बो – हाडे , अमोल सरडे , दिनेश भांदुर्गे , महावीर वलटे , हनीफ शेख , विशाल चौगुले , आकाश वाल्मीकी , अमेय रसाळ , मयुर भोकरे , मोहन दळवी , पंकज देशमुख , यांनी केली आहे .