पिंपरी-चिंचवडदि २५ : – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपयांची लाच घेतानालाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.आहे शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली . त्याबाबत पुढील कारवाई करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक मिलन शंतनु कुरकुटे वय ३२ असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरकुटे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान सायंकाळी तक्रारदार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलेल्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या फसवणुकीच्या पुण्यामध्ये बँकेतील अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. एसीबीने केलेल्या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.मात्र, एसीबीचे एक पथक घराची झडती घेण्यात गेले आहे सदर कारवाई पोलिस उपायुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग विभाग यांनी कारवाई केली आहे