निरा नरसिंहपुर दि ०६ :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा तसेच इंदापूर तालुका मराठी पत्रकारसंघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेचा लाभ 350 युवा पत्रकारांनी घेतला. यानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने देशपातळीवर स्वच्छता अभियानात इंदापूर नगरपरिषदेचा दहावा क्रमांक आल्याबद्दलनगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर कृषी उत्पन्नबाजारसमितीच्या माध्यमातून घोडे बाजार सुरू करून समितीस देश पातळीवर नावलौकिक मिळवून दिल्याबद्दलसभापती तसेच जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्यामाध्यमा तून ग्रामीण युवापिढीसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आप्पा- साहेब जगदाळे, पर्यावरणसंतुलनासाठीसहाजिल्ह्यात एक लाख वीस हजार रोपे मोफत वितरीत करून झाडे लावा झाडे जगवा चळवळ वृद्धिंगत करणारे श्री नारायणदास रामदास शहा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळदास शहा, विश्वस्त मुकुंद शहा व भरत शहा, फोटोग्राफी, प्रिंटिंग क्षेत्रातील संधी ओळखून युवा पिढीसमोरलघुउद्योजक म्हणून आदर्श निर्माण करणारे उद्योजक अनिल गुळूमकर यांचा परिषदेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशपरदेशात दुग्धव्यवसायात इंदापूर तालुक्याचा मानसन्मान वाढवणारे सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, कार्यकारीसंचालक विष्णुकुमार माने तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशातील पत्रकारांच्या हक्कासाठी अनमोल योगदान देणारे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी एम. डी शेख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यशाळेचा शुभारंभ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष युनूसआलम सिद्दिकी यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे होते.
यावेळी श्री सिद्धिकी म्हणाले, पत्रकारिता ही नागरिकांच्या हितासाठी सत्यमेव जयते या तत्वाने करणे ही काळाची गरज आहे. युवापिढी सुद्धा या क्षेत्रात चांगले करिअर करू शकते, त्यामुळे या पिढीने पत्रकारिता करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
त्यावेळी मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विकास शहा , कार्याध्यक्ष अतुल तेरखेडकर, पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश शहा, कैलास पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक अर्जुन भोंग तर सूत्र संचालन तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख व शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी केले.आभार विशाल गुरगुडे यांनी मानले. यावेळी शिखर पत्रकारसंघाचे अध्यक्ष मनोहर चांदणे , शैाकत तांबोळी, राहुल ढावळे, शैलेश काटे, आदम पठाण, विलास गाढवे, धनंजय कळमकर, संदिप बल्लाळ, निखिल कणसे, गणेश कांबळे, दिपक शिंदे, देवा राखुंडे, शिवाजी पवार, बाळासो सुतार, अमोल गुरगुडे, रामवर्मा आसबे, संतोष भोसले हे पत्रकार उपस्थित होते.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार