पुणे दि ०५ : – पुण्यातील व्यापार्याचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणकरून तीक्ष्ण हत्याराने वार तसेच डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. व्यापार्याचे अपहरणकरून हत्या करण्यात आल्याने पुणे शहरात उद्योजग व पुण्यातील व्यापार्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.चंदन कृपादास शेवानी (वय ४८, रा. बंडगार्डन असे खून झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.
याप्रकरणी सातारा जिल्हा पोलीस दलातील लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.व, रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ता. खंडाळा गावच्या कॅनॉलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकर्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोक्यात गोळी झाडल्याचे दिसून आले. तर, अंगावर तीक्ष्ण हत्याराच्या खूना असल्याचे समोर आल्यानंतर खून झाल्याचे समजले. त्यानंतर सातारा पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण तसेच मुंबई आणि लोणावळा पोलिसांना संपर्ककरून अनोळखी मृतदेह सापडला असून, मिसींगबाबत चौकशी केली. त्यानंतर दुपारी व्यापारी चंदन शेवानी यांचा मृतदेह असल्याचे समजले. त्याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात मिसींग दाखल असल्याचे समोर आले.पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी सापडली असून, त्यात 2 सीआर. नही दिये, इसके लिये गया, भाई के ऑर्डर पे ठोकणा पडा असे, लि हीले आहे. त्यामुळे दोन कोटींच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरणकरून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर चंदन शेवानी हे घरीच होते. मात्र, रात्री पावणे दहानंतर अचानक ते गायब झाल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी पोलिसांना सांगितले आहे. व पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहे