पुणे दि ०४ :- पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, व अतिक्रमण करून रोडवर विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवार (दि. ३)नव्या आणि काही जुन्या बेकायदा स्टॉलधारकांना हटवून या रस्त्यालगतचे पदपथ महापालिकेने शुक्रवारी मोकळा केला.अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांंंं व स्टॉल ताब्यात घेण्यात आले. व पुढे रस्ता आणि पदपथावर अतिक्रमणे केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा दमही व्यावसायिकांना भरला आहे.या कारवाईत राजकीय आणि अन्य लोकांकडून हस्तक्षेप होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी स्वत: हजर राहून ही कारवाई केली. रोजी पुणे फर्ग्युसन रस्त्यावर कारवाई करण्यात आली आहे. व ५० टपऱ्या सिल करून व इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावरील लिंबू पाणी ड्रेस मटेरियल व ईतर विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले आहे
पान व तंबाखू खाऊन रोडवर थुंकनाऱ्यान वरही कारवाई करण्यात आली आहे