पुणे दि ०३ :- पुणे शहर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील अवैदय धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते व . सदर आदेशाच्या अनुषंगाने दि.०२ रोजी पोलीस शिपाई शशांक खाडे सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यशराज रेस्टॉरंट अॅन्ड लॉजिंग, भेकराईनगर, फुरसुंगी,हडपसर, पुणे येथे इसम नामे १)सुनिल दत्तात्रय उबाळे, वय ३२ वर्षे धंदा – नोकरी यशराज
लॉज रा. माळवाडी साधना शाळेजवळ माळवाडी हडपसर पुणे २)सलमान मेहबुब मुजावर वय २२ वर्षे,रा.उरुळी कांचन काकडे यांचे घर शिंदवणेरोड पुणे ३)शाम काशीनाथ सारणे,
वय ३१ वर्षे धंदा-नोकरी यशराज लॉज रा.भेकराई नगर फुरसुंगी शिवशंकर मंगलकार्यालया जवळ हडपसर पुणे हे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक, श्रीमती वैशाली चांदगुडे यांचे मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीची पडताळणी करुन यशराज लॉज ,भेकराईनगर, हडपसर, पुणे येथे दुपारी ०४ :५५ वा. मिनिटानी छापा टाकुन ३ आरोपी यांनी वेश्याव्यवसायासाठी
आणलेल्या एकूण ६ पिडित मुलींची सुटका करण्यात आली व त्या पैकी ४ पश्चिम बंगाल येथील पिडीत मुलींबाबत कोणते सेक्स रॅकेट आहे का याचा तपास करण्यात येत आहे.
व आरोपी नामे १) सुनिल दत्तात्रय उबाळे, वय ३२ वर्षे
२)सलमान मेहबुब मुजावर, वय २२ वर्षे, ३)शाम काशीनाथ सारणे, वय ३१ वर्षे ४)सदाशिव गणपत साबळे यांचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९७६ कलम ३,४,७,सह भा.दं.वि.क.३७०,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सन २०१९ मध्ये सामाजिक सुरक्षा विभागाकडुन पिटा अंतर्गत एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन ११६ पिडीत मुली त्यामधे ७ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.वरील नमुद कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांचेसह सामाजिक सुरक्षा विभागाकडील पो.हवा.कुमावत,पो.हवा.क्षिरसागर, पो.ना.पठाण, पो.ना.कांबळे, म.पो.ना.पकाळे, म.पो.ना शिंदे,
पो.शि.खाडे, पो.शि.संतोष भांडवलकर,पो.शि.कोळगे यांनी केलेली आहे.