पुणे दि ३०: – पुणे चतुर्श्रुंगी परिसरात गोलदाज चौक जुनी वडारवाडी येथे वाढदिवसानिमित्त विरोधी गटातील तरुणाचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याने तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुर्श्रुंगी परिसरात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी ऋषिकेश चव्हाण (वय २३, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश आणि तीनही आरोपी वडारवाडीत राहतात. एकमेकांचे मित्र आहेत. दरम्यान, ऋषिकेश याने त्याच्या ओळखीतल्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे रविवारी त्या तरुणाचे व्हॉट्सअपला स्टेट्स ठेवले होते.दरम्यान, तो आरोपींच्या विरोधी गटातील तरुण निघाला. याचा राग आरोपींच्या मनात होता.दरम्यान, ऋषिकेश त्याच्या इतर मित्रांसोबत येथील गोलदाज चौक जुनी वडारवाडी येथील बॅडमिंटन खेळत होता. त्यावेळी आरोपी तेथे कोयता घेऊन आले. त्याला शिवीगाळ करुन तु व्हॉट्सअपला स्टेट्स का ठेवले असे म्हणत वाद घातला.व, त्याच्यावर कोयत्याने डोक्यात तसेच पाठीवर व उजवे पायावर वार केले. या प्रकरणी सहायक पोलीस फौजदार सलीम शेख अधिक तपास करीत आहेत.