पिंपरी दि २७ : – गांजाची तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. आहे व त्याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय ३८, रा. बावधन, मुळगाव नरसिंगपुरा, ता. मारवाड, जि. पाली, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार राजन गोविंद महाडिक (वय ५२) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील पाटील नगर येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.त्यानुसार, पोलिसांनी साापळा रचून प्रेमसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला १३ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे