पुणे दि ०१ – पुणे रांजणगांव एमआयडीसीमधील बहुराष्ट्र कंपनीत नोकरीस लावण्याचे अमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या टोळीस पुणे पोलिसांनी केले गजाआड एका महिलेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बीगर नंबर प्लेट ची स्विफ्ट कार, स्प्लेंडर दुचाकी, मोबाईल, कॅश रुपये 13,500 अशी सुमारे 5 लाख 44 हजार 500 रुपये किमतीही मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी अभिजित युवराज पाटील (वय २४, रा. विसर, ता. मिरज, जि. सांगली) आणि त्याचा मित्र शंतनू शिवाजी पाटील यांनी रांजणगांव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार अंकुश रावसाहेब मलगुंडे (वय २८, रा. ढोकसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे), साहिल संतोष कोकरे (वय २०, रा. भटवाडी जामखेड, ता. जामखेड, जि. नगर), महेश रमेश काळे (वय २१, रा. माहिजळगाव, ता.कर्जत, जि. नगर) आणि जयश्री भगवान कांबळे (वय २१, सध्या. रा. यशइन चौक
शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपींनी एका दैनिकात जाहिरात देऊन तरुणांना १८ ते २५ हजार रुपये व राहणे जेवण फ्री मध्ये व कोणतीही शिक्षणाची अट नाही अशी जाहिरात व परमनंट नोकरी देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार अभिजित पाटील आणि त्याचा मित्र शंतनू यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानुसार त्यांना पुणे रांजणगांव एमआयडीसीत येण्यास सांगितले. त्यानुसार दोघेही १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११ च्या सुमारास रांजणगांव एमआयडीसीत येऊन फोन केला. यावेळी त्यांना कंपनीची गाडी तुम्हाला नेण्यास येईल असे सांगितले. त्यानुसार स्विफ्ट कार त्यांना नेण्यास आली. त्यानंतर दोघांना एका कंपनी जवळ नेऊन इथे थांबले असलेल्या मोटरसायकल वरील दोन इसमांनी त्यांना सांगितले की मी तुम्हाला कंपनीमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून फीच्या नावाखाली १५०० रूपये घेतले आणि बूट आणि कपड्याची रूपये ९५० लागतील असे म्हणून त्याचीही मागणी केली. यावेळी दोघांना संशय आल्यामुळे त्यांनी पैसे देण्यास नकार दिला व आरोपी यांनी त्या दोघांना मारहाण करण्यात आली. यानंतर दोघांनी रांजणगांव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.त्यानुसार सदर टोळीचा शोध घेण्याकरता पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, यांनी सहा फौजदार सुधाकर कोळकर, पोलीस हवालदार संतोष आवटे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रफुल भगत, मंगेश धिगळे,मपोशि निर्मला आव्हाड, यांचे एक स्वतंत्र पथक नेमून त्यांना पकडणे बाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे रांजणगाव एमआयडीसी सदर पथकाने गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून तिघांना गजाआड केले. तसेच फोन करून भुरळ घालणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केले आहे. या संशयित आरोपीना न्यायालयात हजर केले असता २ डिसेंबर २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहा फौजदार सुधाकर कोळेकर करीत आहेत.