नीरा नरसिंहपूर, ता. २९ : – शासनाचे विविध दाखले, योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन सरपंच रमेश ( बापू ) कोकाटे यांनी केले. सराटी ( ता इंदापूर ) येथे आपले सरकार सेवा केंद्र उदघाट्न सरपंच रमेश ( बापू ) कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबा कोकाटे, अॅ ड. राहुल जगदाळे,मुसाभाई तांबोळी, इन्नुस आत्तार, मुबारक तांबोळी, ग्रामसेवक हनुमंत पाटिल, हुसेन तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात हुसेन तांबोळी यांनी सांगितले, आपले सरकार सेवा केंद्रात ७/१२ उतारे, विज बिल भरना, मनी ट्रांसफर, तहसीलचे दाखले, उत्पन्न, डोमसिअल, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर आदि सुविधा उपलब्ध झाल्या आहे. या परिसरातील जवळपास १५ ते २० गावांना याचा लाभ होणार असून वेळ व पैसा वाचणार आहे.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी