पिंपरी दि २६ : – तक्रारीं आरोपी निगडी प्राधिकरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद चायनीज गाडी सुरु करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्याच्या पोलिस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगेहाथ पकडले. हि कारवाई निगडी पोलीस ठाण्याच्या समोर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.प्रविण मुळूक असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ट्रान्सपोर्टनगरी येथे एक चायनीज गाडीवर व्यवसाय करतो. ही गाडी अनेक महिन्यांपासून बंद होती. ही गाडी सुरु करण्यासाठी मूळूक याने त्यांच्याकडे पैश्याची मागणी केली. याबाबत त्या व्यवसायिकांनी लुचपत प्रतिबंधात्मक पथकास माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आज मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याच्या बाहेर लाच स्विकारताना मुळूक याला रंगेहाथ पकडण्यात आले.आहेव लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे संजय पाटील यांच्या निगडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पथक प्रतिक्रिया गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केली आहे शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केलेल्या याबाबत लाचलुचपत विभाग पुणे कार्यालय खालील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केली आहे दूरध्वनीक्रमांक०२०-२६१२२१३४ व्हाट्सअप क्रमांक :- ७८७५३३३३३३